राष्ट्रवादी बैठकीत ईव्हीएमचा संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 11:11 PM2018-08-05T23:11:54+5:302018-08-05T23:12:32+5:30

ESP of the EVM in the NCP meeting | राष्ट्रवादी बैठकीत ईव्हीएमचा संशयकल्लोळ

राष्ट्रवादी बैठकीत ईव्हीएमचा संशयकल्लोळ

Next


सांगली : महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्टÑवादीच्या सांगलीत झालेल्या बैठकीत रविवारी ईव्हीएमबद्दल (मतदान यंत्र) संशयकल्लोळ झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच यंत्राबद्दलच्या तक्रारींचा पाऊस पडला. शेवटी एकमताने याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विजय कॉलनीतील राष्टÑवादी कार्यालयात दुपारी राष्टÑवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. निवडून आलेल्या पक्षाच्या सदस्यांचा सत्कार जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. बैठकीला पराभूत उमेदवार व त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. बैठकीत ७० टक्के पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्र, अधिकाऱ्यांकडून मिळालेली चुकीची वागणूक, यंत्रणेकडून झालेला त्रास याबद्दल तक्रारी मांडल्या. यावेळी माजी नगरसेविका प्रियांका बंडगर म्हणाल्या की, ज्या उमेदवारांना फारसे कुणी ओळखतही नाही, त्यांना हजारो मते कशी मिळू शकतात. आजवर पोस्टल मतांमध्ये जो कौल दिसतो, तोच मूळ निकालात दिसत असतो, असा अनुभव असताना, यावेळच्या निवडणुकीत पोस्टल मतांच्या कौलाविरुद्ध मूळ निकाल लागल्याचे दिसून येते. हा संशयास्पद प्रकार ईव्हीएममुळे झाला आहे. या यंत्रांनी सामान्य उमेदवारांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे संशयाच्या भोवºयात सापडलेल्या या यंत्रांना हद्दपार करावे.
संतोष सुर्वे म्हणाले की, प्रभाग क्र. ३ मध्ये निकालापूर्वीच फटाक्यांची आतषबाजी झाली होती. यंत्रांच्या तपासणीबाबत आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही. यंत्र सील होण्यापूर्वी राष्टÑवादी कार्यकर्त्यांना हाकलले गेले. संपूर्ण यंत्रणाच चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्याचा संशय आम्हाला असूनही आम्ही काही करू शकलो नाही. प्रचंड दबाव शासकीय यंत्रणेवर असल्याचे आम्हाला जाणवत होते. त्यामुळे या यंत्रांची तसेच एकूणच यंत्रणेची चौकशी आयोगाने करायला हवी. एका कार्यकर्त्याने प्रभाग १२ मध्ये बाहेरील प्रभागातून आलेल्या नसिमा शेख यांना मिळालेल्या मतांकडे लक्ष वेधले. ज्या उमेदवारांना लोक ओळखतही नव्हते, त्यांच्या पदरात इतकी मते आलीच कुठून?, असा सवाल उपस्थित केला. अनेक प्रभागातील लोकसुद्धा या निकालाने अवाक् झाले आहेत. त्यांच्या मनातसुद्धा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे ही यंत्रणा बदलण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पहिल्या अनेक फेºयांमध्ये आघाडीवर असलेल्या उमेदवारांना शेवटच्या तीन फेºयांमध्ये अचानक कशी मते वाढतात?, असा सवालही उपस्थित केला. बैठकीस माजी महापौर सुरेश पाटील, इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, विनया पाठक, धनपाल खोत आदी उपस्थित होते.
आयोगाकडे तक्रार करणार!
राष्टÑवादीचे सर्वच नगरसेवक व पराभूत उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम यंत्राबद्दल तसेच एकूण यंत्रणेबद्दल तक्रार करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात व्हीव्हीपॅट किंवा मतपत्रिकांचा वापर निवडणूक आयोगाने याठिकाणी करावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे. संशयास्पद वाटणाºया निकालांविषयी अपील दाखल करून शक्य तिथंपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या सोमवारीच तातडीने याबाबतचे पत्र तयार करून त्यावर सर्वांच्या एकत्रित स्वाक्षºया घेऊन तक्रार करण्यात येणार आहे.

Web Title: ESP of the EVM in the NCP meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.