‘भ्रूणहत्या’ रोखण्यासाठी पहिली आंतरराज्यस्तरीय समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 09:39 PM2019-01-25T21:39:33+5:302019-01-25T21:40:45+5:30

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भारती हॉस्पिटल सांगलीतील चौगुले हॉस्पिटल मधील घडलेल्या गर्भपात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला ...

 Establishing the first inter-state level committee to prevent 'feticide' | ‘भ्रूणहत्या’ रोखण्यासाठी पहिली आंतरराज्यस्तरीय समिती स्थापन

‘भ्रूणहत्या’ रोखण्यासाठी पहिली आंतरराज्यस्तरीय समिती स्थापन

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा शल्य चिकित्सकांचा समावेश : गर्भपात करणाऱ्या डॉक्टर ‘वॉच’ राहणार

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भारती हॉस्पिटलसांगलीतील चौगुले हॉस्पिटल मधील घडलेल्या गर्भपात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. याची गंभीर दखल घेऊन स्त्री भ्रृणहत्या रोखण्यासाठी पहिली आंतरराज्यस्तरीय संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. स्त्री रोग तज्ञ, सोनोग्राफी केंद्र आणि गर्भपात करणाºया डॉक्टरवर आणि रुग्णलयावर ही समिती नियंत्रण ठेवणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक समकक्ष समूचित प्राधिकारी यांचा या संयुक्त समितीत समावेश आहे.

मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती प्रवीण जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यु झाला होता. दोन मुली नंतर, तिसरी पण मुलगीच असल्याने तिचे पती प्रवीण यांनी तिलागर्भपात करण्यासाठी म्हैशाळमध्ये नेले होते. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या भारती रुग्णालयात गर्भपात करताना तिचा मृत्यु झाला होता. पोलिसांच्या तपासात डॉ. खिद्रापुरे यांने अनेक महिलांचे बेकायदा गर्भपात करुन भ्रूणहत्या केल्यचे उघडकीस आले होते. डॉ. खिद्रापुरे हा हे भ्रूण जमिनीत दफन करीत होता. म्हैशाळ ओढ्यालगत पोलिसांनी खोदकाम केल्यानंतर दफन केलेले १९ भ्रूण सापडले होते. याप्रकरणी मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह १३ संशयितांना अटक करण्यात आली होती.

कर्नाटकातील कागवाडमध्ये गर्भलिंग चाचणी करणे आणि पुढे डॉ. खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपात करणारे ‘रॅकेट’च पोलिसांनी उजेडात आणले होते.सांगलीत चार महिन्यापूर्वी चौगले मॅटर्निटी अ‍ॅण्ड सर्जीकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी डॉ. रुपाली चौगुले आणि डॉ. विजयकुमार चौगुले यांना अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. हे दाम्पत्य शासकीय सेवेत कार्यरत होते, त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

आॅनलाईन माहिती
स्त्री भ्रृणहत्या रोखण्यासाठी पहिली आंतरराज्यीय संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान तंत्र अधिनियम कायद्यांतर्गत ही समिती कार्यरत असणार आहे. जिल्'ातील पीसीपीएनडीटी कायद्यात येणाºयाया सर्व स्त्री रोग तज्ज्ञ, सोनोग्राफी केंद्रांची माहिती एकत्र करण्याच्या दृष्टीने संगणकीय आज्ञावली (सॉफ्टवेअर) निर्माण केली जात आहे. यामुळे जिल्'ातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती एका दृष्टीक्षेपात आॅनलाईन मिळू शकणार आहे.

 

Web Title:  Establishing the first inter-state level committee to prevent 'feticide'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.