‘राजारामबापू’च्या इथेनॉल निर्मितीचा आज प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:22+5:302020-12-31T04:27:22+5:30

इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आज, गुरुवारी ...

Ethanol production of 'Rajarambapu' starts today | ‘राजारामबापू’च्या इथेनॉल निर्मितीचा आज प्रारंभ

‘राजारामबापू’च्या इथेनॉल निर्मितीचा आज प्रारंभ

Next

इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आज, गुरुवारी सकाळी ११.३० वाजता करण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, राजारामबापू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ करताना जयंत पाटील यांनी साखर निर्मितीबरोबरच इथेनॉल निर्मिती करण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे आम्ही इथेनॉल निर्मिती सुरू करीत आहोत. हा पथदर्शी प्रकल्प ५० दिवसांत पूर्ण केला असून, प्रतिदिन ७८ हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. सध्या साखर उद्योग एका संक्रमण काळातून जात आहे. एका बाजूला एफआरपी देत असताना त्या प्रमाणात साखर विक्रीला दर मिळत नाही, हा मोठा प्रश्न साखर उद्योगापुढे निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी साखर निर्यात केल्यास त्याचे अनुदान वेळेवर मिळत नाही. त्यामुळे सध्या इथेनॉल निर्मिती हा एक चांगला पर्याय पुढे आला आहे. आज सकाळी होणाऱ्या कार्यक्रमास सभासद, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, दिलीपराव पाटील, एल. बी. माळी, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली उपस्थित होते.

जयंत पाटील यांचा सिंगल फोटो घ्यावा.

Web Title: Ethanol production of 'Rajarambapu' starts today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.