गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला गुळाला ४०५० रुपयांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:54+5:302021-09-09T04:32:54+5:30
सांगली : गेल्या वर्षभरापासून गुळाला चांगला भाव मिळालाच नव्हता. परंतु, बुधवारी सांगली मार्केट यार्डात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला निघालेल्या सौद्यात गुळाला ...
सांगली : गेल्या वर्षभरापासून गुळाला चांगला भाव मिळालाच नव्हता. परंतु, बुधवारी सांगली मार्केट यार्डात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला निघालेल्या सौद्यात गुळाला प्रतिक्विंटल चार हजार ५० रुपयांचा दर मिळाला आहे. या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
गुळाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे गुऱ्हाळ चालक संकटात सापडले होते. सांगली मार्केट यार्डात दि.१ एप्रिल ते आजअखेर पाच लाख ५५ हजार ४३६ क्विंटल गुळाची आवक झाली होती. या गुळाला तीन हजार ते तीन हजार ४०० रुपयेपर्यंतच दर मिळत होते. बुधवारी गुळाचे सौदे निघाले असून यामध्ये प्रतिक्विंटल गुळाला तीन हजार ५२५ ते चार हजार ५० रुपयेपर्यंत दर मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यातील चांगला दर आहे. पण, गुऱ्हाळे सुरळीत चालण्यासाठी गुळाला प्रतिक्विंटल पाच हजाराच्या पुढेच दर मिळाला पाहिजे, अशी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी भूमिका मांडली आहे.