सत्ता नसली तरी प्रश्न सोडवावेच लागणार

By admin | Published: October 14, 2015 11:18 PM2015-10-14T23:18:08+5:302015-10-15T00:26:52+5:30

जयंत पाटील : पक्षसंघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी

Even if there is no power, it will have to solve the problem | सत्ता नसली तरी प्रश्न सोडवावेच लागणार

सत्ता नसली तरी प्रश्न सोडवावेच लागणार

Next

इस्लामपूर : सत्ता असो वा नसो, गावा-गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम आपणास करावे लागणार आहे. पक्षसंघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन संघटना अधिक गतिमान करू, असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला़
वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसने येथे आयोजित केलेल्या एकदिवसीय ‘जयंत युवा आत्मभान’ शिबिराच्या समारोप समारंभात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, सिनेअभिनेते समृध्दी जाधव, कामधेनू सेवा परिवाराचे डॉ़ लक्ष्मण आसबे, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची उपस्थिती होती. युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, उद्योजक सर्जेराव यादव यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.आ़ पाटील म्हणाले की, आपणास विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे़ राज्यात मंत्र्यांचा गोंधळ सुरू आहे़ आम्ही पूर्वी दुष्काळी परिस्थितीत जेवढी मदत केली होती, तेवढीही मदत भाजपचे सरकार करीत नाही़ इंदू मिलची जागा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मिळण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडून पैसे भरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आम्ही अरबी समुद्रात जागा निश्चित करून डिझाईन केले; मात्र याची कुठे चर्चा होत नाही़
इंद्रजित देशमुख यांनी ‘राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले़ ते म्हणाले की, बुध्दीबरोबर कष्ट करण्याची वृत्ती हवी़ एकाच क्षेत्रात आपण दहा वर्षे काम केले, तर तुम्ही त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. ़
समृध्दी जाधव ‘युवकांची दशा व दिशा’या विषयावर म्हणाले की, कोणाची पोटी जन्म घ्यावा, हे आपल्या हाती नाही़ मात्र निश्चित ध्येय व मनगटातील बळाच्या जोरावर तुम्ही यश गाठू शकता़ आत्मभान बाळगणाारा युवक निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो़
डॉ़ लक्ष्मण आसबे यांनी ‘तेजस्वी युवक आणि संवाद कौशल्य’ या विषयावर तसेच युवक राष्ट्रवादीचे मिरज तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार, महिला राष्ट्रवादीच्या वाळवा तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले़
याप्रसंगी माणिकराव पाटील, पी़ आऱ पाटील, प्रा़ शामराव पाटील, विष्णुपंत शिंदे, बी़ के. पाटील, नेताजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, विजयबापू पाटील, विराज शिंदे, दादासाहेब मोरे, सुनील पोळ उपस्थित होते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी उमेश पवार यांनी आभार मानले. गोपाळ पाटसुपे यांनी सूत्रसंचालन केले़ (वार्ताहर)

Web Title: Even if there is no power, it will have to solve the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.