बिरोबा यात्रेच्या मुख्य दिवशीही आरेवाडीत मंदिर परिसरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:29 AM2021-04-20T04:29:11+5:302021-04-20T04:29:11+5:30
ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाच्या यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता; मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने ...
ढालगाव :
आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाच्या यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता; मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट होता.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा देवाच्या यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता. या यात्रेत लाखो भाविक येत असतात; मात्र सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचा वाढता प्रसार पाहून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे यावर्षीही प्रशासन व यात्रा कमिटी यांनी यात्रा रद्द केली आहे. त्यामुळे बिरोबा मंदिर परिसरात शुकशुकाट होता.
सलग दोन वर्षांपासून यात्रा बंद झाल्याने अनेक छोट्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सलग तीन ते चार दिवस ही यात्रा भरते. त्यामुळे हॉटेल, नारळ, मेवामिठाई, बांगडीवले, घोंगडी विक्रेते या यात्रेत लाखोंचा व्यवसाय करत होते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा बंद केल्याने उपासमारीची वेळ आली आहे.