नोव्हेंबर उजाडला तरी पारा गरमच; तापमान ३२ अंशावर : दोन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 09:03 PM2019-11-06T21:03:57+5:302019-11-06T21:07:17+5:30

भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार गुरुवारी तापमानात अंशाने वाढ होणार असून, १० नोव्हेंबरपर्यंत तापमान ३४ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा वाढणार आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत असून, थंडी पडण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

Even though November is hot, mercury is hot | नोव्हेंबर उजाडला तरी पारा गरमच; तापमान ३२ अंशावर : दोन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज

नोव्हेंबर उजाडला तरी पारा गरमच; तापमान ३२ अंशावर : दोन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज

Next
ठळक मुद्देअवकाळीतून बचावलेल्या पिकांना दिलासा मिळणार आहे.

सांगली : दरवर्षी नोव्हेंबरमध्ये दाट धुके, थंडी असा अनुभव घेणाऱ्या सांगली जिल्'ातील नागरिकांना यंदा विचित्र हवामानास सामोरे जावे लागत आहे. ढगांची दाटी, मधूनच कोसळणारा पाऊस आणि त्यातही वाढलेले तापमान अशा वातावरणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सांगली जिल्'ाचे सरासरी कमाल तापमान बुधवारी ३२ अंश सेल्सिअस नोंदले असून, यात आणखी दोन अंशाची वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

 

सांगली जिल्'ातील एकाच दिवसात धुके, उष्मा, ढगांची दाटी आणि पाऊस असा विचित्र अनुभव गेल्या काही महिन्यांपासून येत आहे. हा लहरीपणा अजूनही कायम आहे. नोव्हेंबर महिना उजाडला तरी, थंडी सक्रिय झालेली नाही. आॅक्टोबर महिनाही अवकाळी पावसाने व्यापला होता. दरम्यान, तापमानात घट झाली नाही. प्रत्येक दिवाळीत बोचरी थंडी अनुभवणाºया नागरिकांना पावसाचा सामना करावा लागला. आता उकाडा सहन करावा लागत आहे. बुधवारी सांगली जिल्'ाचे सरासरी कमाल तापमान ३२ अंश, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. वास्तविक जिल्'ाचे नोव्हेंबरमधील सरासरी कमाल तापमान ३० ते ३१ अंश, तर किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस असते. या सरासरीपेक्षा सध्याचे तापमान अधिक आहे.

भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार गुरुवारी तापमानात अंशाने वाढ होणार असून, १० नोव्हेंबरपर्यंत तापमान ३४ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा वाढणार आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होत असून, थंडी पडण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. जिल्'ात दरवर्षी आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये धुके अस्तित्वात असते. प्रतियुनिट धुक्यातील पाण्याचे थेंब विचारात घेतल्यास ०.१ ग्रॅम अशी त्याची सरासरी आहे. सध्या कुठेही धुके दिसत नाही. त्यामुळे विचित्र हवामानाची मालिका अद्याप कायम आहे.

९ नोव्हेंबपासून आकाश निरभ्र
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार गुरुवारी जिल्'ाच्या काही भागात ढगांची दाटी आणि तुरळक पावसाची चिन्हे असून, शुक्रवारी काहीठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर ९ नोव्हेंबरपासून जिल्'ात आकाश निरभ्र राहणार आहे. त्यामुळे अवकाळीतून बचावलेल्या पिकांना दिलासा मिळणार आहे.

 

Web Title: Even though November is hot, mercury is hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.