कोरोना रोखण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:38+5:302021-05-20T04:28:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : मागील काही दिवसांपासून जत तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता थोडी अस्वस्थता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव :
मागील काही दिवसांपासून जत तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता थोडी अस्वस्थता होती. मात्र, जतसाठी ७० बेड्सचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करू शकलो, याचे समाधान आहे. तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असून, कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
जत येथील कोविड सेंटरचे लोकार्पण बुधवार दि. १९ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, जि. प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले, प्रभारी पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील पुढे म्हणाले, जत आणि सांगली शहर हे अंतर फार आहे. हे अंतर लक्षात घेता जत शहरात ७० ऑक्सिजन बेड्सची सुविधा असणारे कोविड सेंटर उभारले. या सेंटरमुळे परिसरातील रुग्णांना सहाय होणार आहे. मात्र, वाढणारी रुग्णसंख्या कमी करणे हे आपले प्राथमिक ध्येय आहे आणि त्यासाठी सर्वांनी लॉकडाऊनची बंधने पाळणे आवश्यक आहे.
आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सध्याचे सुरू होणारे ७० ऑक्सिजनचे बेड उपयोगी ठरणार आहे. मात्र, तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, जि. प. सदस्य सुनीता पवार, महादेव पाटील, तम्मनगौडा रवी पाटील, ब्रह्मानंद पडळकर, नगरसेवक उमेश सावंत, नगरसेवक टिमू एडके, नाना शिंदे, नगरसेवक प्रमोद हिरवे, नगरसेवक स्वप्निल शिंदे, भूपेंद्र कांबळे, संग्राम जगताप, सुनील पवार, युवराज निकम, प्रभाकर जाधव, संतोष मोटे आदी उपस्थित होते.