सांगली लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम मशिन्स स्ट्राँग रूम सीलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:16 PM2019-04-25T12:16:57+5:302019-04-25T12:19:46+5:30

सांगली लोकसभा मतदार संघात दि. 23 एप्रिल रोजी मतदान झाले. त्यानंतर विधानसभा मतदार संघ निहाय सर्व ईव्हीएम मशिन्स सेन्ट्रल वेअर हाऊस येथे आणण्यात आल्या. या ईव्हीएम मशिन्स ठेवलेली स्ट्राँग रूम सील बंद करण्यात आली.

EVM machines in Sangli Lok Sabha constituency sealed cloth | सांगली लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम मशिन्स स्ट्राँग रूम सीलबंद

सांगली लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम मशिन्स स्ट्राँग रूम सीलबंद

Next
ठळक मुद्देसांगली लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम मशिन्स स्ट्राँग रूम सीलबंदनिवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती

सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात दि. 23 एप्रिल रोजी मतदान झाले. त्यानंतर विधानसभा मतदार संघ निहाय सर्व ईव्हीएम मशिन्स सेन्ट्रल वेअर हाऊस येथे आणण्यात आल्या. या ईव्हीएम मशिन्स ठेवलेली स्ट्राँग रूम सील बंद करण्यात आली.

निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मिरज उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशिन्स ठेवलेली स्ट्राँग रूम सील बंद करण्यात आली.


याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात काल दि. 23 एप्रिल रोजी 44 सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 1 हजार 848 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिन्स सेंट्रल वेअर हाऊस, (जिल्हा क्रीडा संकुलच्या मागे) मिरज येथे पोलीस बंदोबस्तात आणण्यात आल्या.

या सर्व ईव्हीएम मशिन्स गोदामात लावून घेण्यात आल्या. सेंट्रल वेअर हाऊस येथील एका गोदामात 6 कम्पार्टमेंटमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय ही ईव्हीएम मशिन्स लावून घेण्यात आली. त्यानंतर विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशिन्स सीलबंद करण्यात आली. त्यानंतर सवांर्ंच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम सीलबंद करण्यात आली व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताब्यात स्ट्राँग रूमची किल्ली देण्यात आली.

या स्ट्राँग रुमवर मतमोजणीपर्यंत दररोज राजपत्रित अधिकारी व पोलीस अधिकारी, 16 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 100 पोलीस यांची 24 तास कडक पहारा राहणार आहे.
 

Web Title: EVM machines in Sangli Lok Sabha constituency sealed cloth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.