केंद्रीय पथकाकडून कागदपत्रांची तपासणी सुरू : स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान, महापालिकेची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:22 PM2018-02-22T23:22:30+5:302018-02-22T23:26:03+5:30
सांगली : शासनाच्या स्वच्छ सर्र्व्हेक्षण अतंर्गत गुरुवारी केंद्रीय समितीने स्वच्छता, घनकचरा, सुलभ शौचालय, वैयक्तिक शौचालय योजनेसह महापालिका राबवित असलेल्या विविध प्रकल्पांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू झाली आहे
सांगली : शासनाच्या स्वच्छ सर्र्व्हेक्षण अतंर्गत गुरुवारी केंद्रीय समितीने स्वच्छता, घनकचरा, सुलभ शौचालय, वैयक्तिक शौचालय योजनेसह महापालिका राबवित असलेल्या विविध प्रकल्पांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू झाली आहे. सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर शनिवार, रविवारी पथकाकडून काही ठिकाणी स्थळ पाहणी करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्र्व्हेक्षण स्पर्धेत देशात ५० शहरांच्या यादीत येण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड महापालिका उतरली आहे. शहरात स्वच्छता, कचरा उठाव, औषध फवारणी यासह अनेक उपाययोजना पहाटेपासून सुरु होत्या. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गेल्या दोन दिवसांपासून पहाटेपर्यंत अधिकारी, कर्मचाºयांच्या बैठका घेत आहेत. स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत स्वच्छता अॅपमध्ये देशात १५ वा, तर महाराष्ट्रात प्रथम आल्यानंतर प्रशासनाचे होप्स वाढले आहेत. बुधवारी स्वच्छ सर्व्हेक्षणची दिल्ली येथील केंद्रीय समिती सांगलीत दाखल झाली आहे. समितीचे प्रमुख कुमार जाधव, सदस्य जमीर लांडगे, रणलेक फासे ही समिती दाखल झाली आहे.
आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी बुधवारी सकाळी उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख, प्रमुख अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. सकाळी आल्यानंतर केंद्रीय समितीने महापालिका स्वच्छ सर्र्व्हेक्षण अतंर्गत राबवत असलेल्या प्रकल्पाच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली. ड्रेनेज योजना, पाणीपुरवठा योजना, सुलभ शौचालय, वैयक्तिक शौचालय योजना, घनकचरा प्रकल्पांतर्गत खत प्रकल्प, प्लास्टिक निर्मूलन अतंर्गत कापडी पिशव्या तयार करणे, याचबरोबर लोकसहभागाने सुरू असलेल्या योजनांचे प्रस्ताव, यातील कागदपत्रांची माहिती घ्यायला समितीच्या सदस्यांनी सुरुवात केली आहे. आरसीएच सेंटरमध्ये केंद्रीय पथकाने कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. पुन्हा संध्याकाळी आयुक्त खेबूडकर यांनी प्रमुख अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. हे पथक कागदपत्रे तपासून ती केंद्राकडे अपलोड करीत आहेत.
केंद्रीय पथकाकडून गुरुवारी महापालिका राबवित असलेल्या विविध प्रकल्पांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.