सांगलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:56 AM2019-11-27T00:56:57+5:302019-11-27T00:57:15+5:30

सांगली : राज्यात भाजप सरकार कोसळल्याने व नव्याने येणाऱ्या सरकारमध्ये राष्टÑवादीचा सहभाग असल्याने मंगळवारी येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा ...

Excitement of NCP workers in Sangli | सांगलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष

सांगलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष

Next

सांगली : राज्यात भाजप सरकार कोसळल्याने व नव्याने येणाऱ्या सरकारमध्ये राष्टÑवादीचा सहभाग असल्याने मंगळवारी येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नागरिकांना साखर वाटप करीत राष्टÑवादीच्या विजयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
येथील जिल्हा कार्यालयासमोर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यकर्ते एकत्र आले. ‘राष्टÑवादीचा विजय असो’, ‘जयंत पाटील यांचा विजय असो’, अशी घोषणाबाजी करीत त्यांनी एकच जल्लोष केला. नागरिकांना साखर वाटप करण्यात आली. राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा आनंद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी संगीता हारगे, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, योगेंद्र थोरात, स्वाती पारधी, आयुब बारगीर, संजय तोडकर, उत्तम कांबळे आब्बा, अनिता पांगम, शुभम जाधव, मनोज भिसे, ज्योती आदाटे, वंदना चंदनशिवे, राधिका हारगे, अक्षय अलकुंटे, संदीप व्हनमाने, संदीप कांबळे, आयेशा शेख, जस्विर कौर खुगरा, प्रियांका तुपलोंढे आदी उपस्थित होते.
तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीचा जल्लोष
तासगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट होताच, तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या घटनेनंतर तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. मात्र मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला. मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तासगाव शहरात आतषबाजी करून जल्लोष केला.
राष्टÑवादीच्या एकसंधतेचा विजय
राष्टÑवादी पक्षात शरद पवार यांचा शब्द अंतिम असतो. त्यामुळे त्यांच्याशी व पक्षाशी प्रतारणा करून अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचा पराभव आणि राष्टÑवादीच्या एकसंधतेचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.

Web Title: Excitement of NCP workers in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.