मल्लखांब दिनानिमित्त चित्तथरारक प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:23+5:302021-06-17T04:19:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली जिल्हा अमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन व सांगली जिल्हा स्पोर्टस ॲक्रोबेटिक्स असोसिएशन यांच्यातर्फे आदर्श शिक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली जिल्हा अमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन व सांगली जिल्हा स्पोर्टस ॲक्रोबेटिक्स असोसिएशन यांच्यातर्फे
आदर्श शिक्षण मंदिरच्या क्रीडांगणावर मल्लखांब दिनानिमित्त चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
यावेळी मल्लखांब पूजन राष्ट्रीय प्रशिक्षक दिबेयेनंदू चक्रवर्ती यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी राज्य व राष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग घेऊन मल्लखांब व दोरीच्या मल्लखांबाला सलामी देऊन चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. कमीत कमी जागेमध्ये कमी वेळेत, कमी खर्चात, सर्व शरीराला उत्तम व्यायाम देणारा जगातील एकमेव खेळ म्हणजे मल्लखांब होय. खेळाडूंनी या भारतीय खेळात सहभाग घेऊन शासनाच्या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांनी केले.
यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, नरेंद्र सोपल, अनिल चोरमुले, माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. दीपक सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर हेमंत सावंत यांनी आभार मानले.