जिल्ह्यात कोविडसाठी वैद्यकीय यंत्रणेचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:44+5:302021-04-25T04:25:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वैद्यकीय पंढरी म्हणून गेल्या काही वर्षांत विस्तारलेले वैद्यकीय क्षेत्र, येथील वैद्यकीय सुविधा, पॅरामेडिकल स्टाफ, ...

Expansion of medical system for Kovid in the district | जिल्ह्यात कोविडसाठी वैद्यकीय यंत्रणेचा विस्तार

जिल्ह्यात कोविडसाठी वैद्यकीय यंत्रणेचा विस्तार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : वैद्यकीय पंढरी म्हणून गेल्या काही वर्षांत विस्तारलेले वैद्यकीय क्षेत्र, येथील वैद्यकीय सुविधा, पॅरामेडिकल स्टाफ, मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल्स यांची कोविड व्यवस्थापनात मोठी मदत मिळाली. यातच मागील वर्षातील अनुभवातून सुधारणा करीत जिल्हा प्रशासनाने कोविडसाठी आवश्यक सामग्री अधिक वाढवली. त्यामुळे दुसऱ्या लाटेत इतकी रुग्णसंख्या वाढल्यानंतरही अद्याप बेडची उपलब्धता दिसत आहे.

जिल्हा कोविड रुग्णालये, डेडिकेटड (समर्पित) कोविड हेल्थकेअर सेंटर्स, कोविड केअर सेंटर्स यांच्या माध्यमातून जिल्ह्यात सध्या कोविडचे व्यवस्थापन केले जात आहे. जास्तीत जास्त यंत्रणांचा वापर करून रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी धडपड सुरू आहे. मागील वर्षापेक्षा यावेळी कोविड व्यवस्थापनात वैद्यकीय यंत्रणा व उपकरणांची संख्या वाढली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

चौकट

प्रकार संस्था एकूण बेड ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटर्स एचएफएनओ बीपॅप

कोविड रुग्णालये ४१ २२७५ १८९८ २६६ ११५ १२२

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर १५ ५८७ ५६१ १७ ६ १९

कोविड केअर सेंटर्स ११ ८५४ ० ० ० ०

(यातील एचएफएनओ ही हाय फ्लो नोजल ऑक्सिजन यंत्रणा आहे. बीपॅप हे यंत्र श्वसनातील आपत्कालीन अडचणीवेळी वापरले जाते. )

चौकट

ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता

लहान ६९३

जंबो १३६७

ड्युरा ७७

चौकट

जिल्ह्यात ऑक्सिजन क्षमता

जिल्हा प्रशासनाकडील आकडेवारीनुसार सध्या प्रतिदिन ४८.८४ किलोलिटर ऑक्सिजनची उपलब्धता आहे. यामध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयातील क्षमता ४२.८४ किलोलिटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्सकडे ६ किलोलिटर क्षमता आहे. सांगलीतील खासगी वितरकाकडून दररोज २० हजार लिटर, इस्लामपुरातील वितरकाकडून पाच हजार लिटर ऑक्सिजन पुरवठा होतो. मिरजेतील शासकीय रुग्णालयातील टँकरची क्षमता १६ हजार लिटरची आहे.

Web Title: Expansion of medical system for Kovid in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.