केंद्र सरकार शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:29+5:302021-07-20T04:19:29+5:30
सांगली : केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क ...
सांगली : केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, आदी प्रक्रियेसाठी आता ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त संभाजी पोवार यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी याची माहिती देण्याचीही सूचना त्यांनी केली.
------
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अर्ज करा
सांगली : राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत ब्लड ऑन कॉल-जीवन अमृत सेवा ही योजना राबविण्यासाठी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता हे एक पद भरण्यात येणार आहे. तरी २७ जुलेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे.
----
तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा
सांगली : तंबाखूचे सेवन हे कॅन्सरसारख्या रोगाला निमंत्रण देते. त्यामुळे तंबाखू सेवन टाळणे हितावह आहे. देशात तंबाखू सेवनाचे प्रमाण अधिक असल्याने ते टाळणे व तंबाखूमुक्त समाज निर्माण करणे ही गरज आहे. त्यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा, असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाबाबत चर्चा झाली.
------