रद्द झालेली जीएसटी नोंदणी पूर्ववत करण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:28+5:302021-09-24T04:30:28+5:30
सांगली : विविध कारणांमुळे अनेक उद्योजक, व्यावसायिकांना वेळेत विवरणपत्र दाखल करता आले नाही. नियमानुसार ज्यांची नोंदणी रद्द झाली आहे, ...
सांगली : विविध कारणांमुळे अनेक उद्योजक, व्यावसायिकांना वेळेत विवरणपत्र दाखल करता आले नाही. नियमानुसार ज्यांची नोंदणी रद्द झाली आहे, अशा लोकांसाठी नोंदणी पूर्ववत करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट व सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे यातील अनेकजण विवरणपत्र दाखल करू शकले नाहीत. यामुळे अनेकांची नोंदणी रद्द झाली. अशा करदात्यांना नोंदणी पुनर्स्थापना करण्यासाठी आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्याचबरोबर विवरणपत्र विलंब शुल्क अभय योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. करदात्यांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय जीएसटीच्या सांगली विभागाचे सहायक आयुक्त किशोर गोहिल यांनी केले आहे.