फ. मुं. शिंदे, पतंगरावांच्या टोलेबाजीने रसिकांना गुदगुल्या
By Admin | Published: January 4, 2015 11:58 PM2015-01-04T23:58:52+5:302015-01-05T00:34:18+5:30
ज्ञानभारती ग्रंथप्रदर्शन : सांगलीत ग्रंथदिंडी, व्याख्यान उत्साहात
सांगली : खुमासदार आणि खुसखुशीत भाषणबाजीने माजी मंत्री आ. पतंगराव कदम आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी रविवारी ज्ञानभारती ग्रंथप्रदर्शनात रसिकांना गुदगुल्या केल्या. दोन तास रंगलेल्या या उद्घाटन सोहळ््यात हशा आणि टाळ््यांचा गजर झाला.
भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाच्यावतीने कच्छी जैन भवन येथे आयोजित ज्ञानभारती शब्दोत्सव २०१५ चे उद्घाटन रविवारी करण्यात आले. पतंगराव व फ. मुं. शिंदेच्या टोलेबाजीने उद्घाटन सोहळ््याला रंगत आली.
फ. मुं. शिंदे म्हणाले, ग्रंथाशी आपला संबंध हा शालेय जीवनापासूनच येतो. आपल्याला विविध ज्ञानाची कवाडे खुली करण्याचे कार्य ग्रंथांच्या माध्यमातून करण्यात येते. कित्येकवेळा ग्रंथ आणि आपला आत्मिय संवाद होतो. आपण दोघेच एकमेकांशी बोलत असतो. त्यातूनच आपल्याला ज्ञान मिळते. दिवसामध्ये ठराविक वेळ ग्रंथवाचन केले पाहिजे कारण भाषेच्या माध्यमातूनच आपल्यावर संस्कार होत असतात आणि ते चिरकाल टिकतात.
पतंगराव म्हणाले, ग्रंथामध्ये फार मोठी वैचारिक ताकद असते. रशिया, फ्रान्स येथे झालेली क्रांती ही ग्रंथाच्या माध्यमातूनच झालेली आहे. जगात ज्यांनी उत्तुंग यश मिळविले, त्यांचे चरित्र पाहिल्यास त्यांनी प्रचंड वाचन केल्याचेच लक्षात येईल. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, भारती विद्यापीठ सांगलीचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, त्रिलोकनाथ जोशी, अर्थतज्ज्ञ जे. ए. पाटील, प्राचार्या पूजा नरवाडकर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी प्रास्ताविक केले. सायंकाळी केदार फाळके यांचे व्याख्यान झाले. (प्रतिनिधी)