फडणवीस पूर व्यवस्थापनात अपयशी ठरले होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:29 AM2021-07-30T04:29:11+5:302021-07-30T04:29:11+5:30
सांगली : महाविकास आघाडी महापुराचे योग्य नियोजन करण्यात यशस्वी झाली. याउलट २०१९मध्ये फडणवीस सरकार याबाबत पूर्णपणे अपयशी ठरले होते, ...
सांगली : महाविकास आघाडी महापुराचे योग्य नियोजन करण्यात यशस्वी झाली. याउलट २०१९मध्ये फडणवीस सरकार याबाबत पूर्णपणे अपयशी ठरले होते, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केला.
सांगलीत पूरस्थितीची पाहणी त्यांनी केली. अंकलीसह काही गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी ते म्हणाले की, सध्याच्या महापुराचे नियोजन योग्यपद्धतीने केले आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी चर्चा करून नियोजन केले आहे. अलमट्टीतून मोठा विसर्ग सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात २०१९ची महापूर परस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले.
जलसंपदा विभागाचे नियोजन कमी पडल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांचा आरोप चुकीचा आहे. २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला होता. पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला त्यावेळी तत्कालीन सरकारचे नियोजन चुकलेले होते, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, ॲड. अमित शिंदे, सुरेश पाटील, विष्णू माने आदी प्रमुख उपस्थित होते.