युवकांना ३० लाखाचा गंडा घालणाऱ्या तोतया नौदल अधिकाऱ्याला आष्टा पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 06:48 PM2022-11-20T18:48:44+5:302022-11-20T18:51:28+5:30
नौदलात भरतीचे अमिष
लोकमत न्यूज नेटवर्क: आष्टा, सुरेंद्र शिराळकर
बहादुरवाडी ता वाळवा येथील नितीन मानसिंग दळवी वय २७ या युवकासह सहा युवकांना ३० लाखाला फसवणाऱ्या आकाश काशिनाथ डांगे (वय २३ राहणार पाडळी बुद्रुक ता फलटण) या तोतया नौदल अधिकाऱ्यावर शनिवारी रात्री उशिरा आष्टा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यास आष्टा पोलिसांनी अटक केल्याने युवकांना लाखोंना गंडा घालणारा मोठा मासा पोलिसाच्या गळाला लागला आहे.
बहादुरवाडी येथील नितीन दळवी हा सैन्यात भरतीसाठी प्रयत्न करत होता याचवेळी सेवानिवृत्त जवानामुळे त्याची व आकाश डांगेची गावातच भेट झाली वेरना गाडी क्रमांक एम एच ४२ ए आर २००५ या चारचाकी गाडीतून नौ दल अधिकाऱ्याच्या वेषात आकाश डांगे बहादूरवाडीत आला यावेळी नितीन सोबत सैन्य भरतीची तयारी करणारे त्याचे मित्र संकेत हिंदुराव माने व दीपक अनिल पाटील (दोघे राहणार भडकंबे ता वाळवा), रोहित मानसिंग दळवी( राहणार बहादूरवाडी), राजकुमार नागप्पा कोळी (राहणार आष्टा )व राहुल जयवंत गायकवाड (राहणार काकाचीवाडी ता वाळवा) हे सहा जण आकाश डांगेला भेटले.
यावेळी तुमचे काम नक्की होईल प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले ऑक्टोबर २०१९ मध्ये डांगेने सर्वांना नियुक्ती पत्र दिले व ओरिसा येथे मेडिकल साठी उपस्थित राहण्यास सांगितले २१ मार्च २०१९ रोजी आकाश डांगे सोबत रेल्वेने भुवनेश्वरला गेले डांगे सर्वांना रेल्वे स्थानकावर थांबवून भरती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी गेला व वादळामुळे ट्रेनिंग सेंटर विस्कळीत झाल्याने सांगितले.
आकाश डांगेला सर्वांनी नियुक्ती बाबत वारंवार फोन केलयानंतर त्याने नवीन नियुक्त पत्रे दिले २२ मे २०२० रोजी मेडिकल साठी उपस्थित राहण्यास सांगितले मात्र मार्च २०२० मध्ये कोरोना व लॉकडाऊन मुळे भरतीच झाली नाही भिगवण पोलिसांत आकाश डांगे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वजण डांगेच्या पाडळी येथील गावी गेले त्याने तीस लाख रुपयाचा इंडसन बँकेचा धनादेश दिला मात्र तो वटलाच नाही अखेर सर्व युवकांनी आष्टा पोलीस ठाण्यात डांगे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर,नितीन पाटील, अमोल शिंदे यांनी पुणे येथून डांगेला ताब्यात घेतले.
आष्टा पोलिसांनी तोतया अधिकारी म्हणून वावरणाऱ्या आकाश डांगे यांच्याकडून नौ दल अधिकारी, पोलीस अधिकारी पोशाख तसेच नियुक्तीपत्रे ,शिक्के यासह विविध कागदपत्रे जप्त केली आहेत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"