कवठेएकंदला कायद्याच्या चौकटीतच आतषबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:01 PM2018-10-14T23:01:51+5:302018-10-14T23:01:57+5:30
कवठेएकंद : यात्रेचा उत्सव लोकांच्या भावना आणि श्रध्देसाठी आहे. लोकांना सोबत घेऊनच उत्सव साजरा करताना, काहीबाबतीत भावनांना मुरड घालावी. ...
कवठेएकंद : यात्रेचा उत्सव लोकांच्या भावना आणि श्रध्देसाठी आहे. लोकांना सोबत घेऊनच उत्सव साजरा करताना, काहीबाबतीत भावनांना मुरड घालावी. शासनाचे नियम लोककल्याणासाठीच आहेत. तरी नियमांच्या चाकोरीतच यात्रा व्हावी, यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी कवठेएकंद येथे दसरा बैठकीत बोलताना केले.
कवठेएकंद येथे विजयादशमीला ग्रामदैवत श्री बिºहाडसिध्द देवस्थानचा पालखी सोहळा व त्यानिमित्ताने होणाऱ्या आतषबाजीसाठीची नियोजन बैठक प्रशासनाच्यावतीने सिद्धराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, तहसीलदार दीपक वजाळे, पोलीस निरीक्षक अजय शिंदकर, सरपंच राजश्री पावसे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. खरात म्हणाले की, आतषबाजी करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रत्येक ग्रामस्थाने घ्यावी. रितसर परवाने घेऊनच आतषबाजी करा. लाकडी शिंगटे सादरीकरण एकाचठिकाणी गतवर्षीप्रमाणे करावे. धोकादायक प्रकार वगळून दारूकाम करून लोकांनी सहकार्य करावे. प्रशासन आपल्याबरोबर असेलच. उपाययोजना, बंधने ही आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत. नियमात राहून उत्सव साजरा केला जावा. उल्लंघन करणाºयांवर कारवाई होईल, असेही ते म्हणाले. सर्वच विभागांच्या अधिकाºयांना, कामात कसूर करू नका, अशा सूचनाही त्यांनी केल्या. नियमानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे सांगून, सामाजिक भान ठेवून यात्रा अधिक चांगल्याप्रकारे करण्यासाठी ग्रामस्थ, यात्रा कमिटी, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार दीपक वजाळे, पोलीस अधिकारी अशोक बनकर, मनोज पाटील, रामचंद्र थोरात, देवस्थान ट्रस्टचे सदस्य, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.
दसºयाच्या पार्श्वभूमीवर लाकडी शिंगटे पोखरणे, दारूकाम कच्चे साहित्य जमवणे, अशा पूर्वतयारीला गती मिळाली आहे.
दसरा कामाला गती...
प्रशासनाच्या नेमक्या भूमिकेनंतर ठिकठिकाणच्या दारूशोभा मंडळांच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली. प्रशासनाच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा होती. परंतु शासनाने कडक धोरण न स्वीकारता ‘गोड औषधी भूमिका’ घेऊन ग्रामस्थ व शासन असा एकत्रितपणे आतषबाजीचा उत्सव सुरक्षित, शांततेत पार पाडण्यात सहकार्य करा, असे आवाहन करून नागरिकांनीच शासनाचे काम करावे, अशी भूमिका मांडली.