महिलांचे आरोग्य सुधारल्यास कुटुंब सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:09+5:302021-06-02T04:21:09+5:30

कवठेएकंद (ता. तासगाव) येथे ह्युमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशनमार्फत ‘मासिक पाळी दिन’ साजरा करण्यात आला. या ऑनलाईन वेबिनारला ...

Family empowerment if women's health improves | महिलांचे आरोग्य सुधारल्यास कुटुंब सक्षम

महिलांचे आरोग्य सुधारल्यास कुटुंब सक्षम

Next

कवठेएकंद (ता. तासगाव) येथे ह्युमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशनमार्फत ‘मासिक पाळी दिन’ साजरा करण्यात आला. या ऑनलाईन वेबिनारला महाराष्ट्रातून १७६ लोकांनी नोंदणी केली होती. डॉ. दीपशिखा दिवाकर म्हणाल्या की, मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी जागतिक पातळीवर दरवर्षी २८ मे हा ‘मासिक पाळी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

मासिक पाळी म्हणजे काय, तसेच मासिक पाळीमध्ये घ्यायची काळजी, आहार यांबाबत त्यांनी माहिती दिली. उपसरपंच शर्मिला घाईल, श्रीमती पी. आर. पाटील, रितू पहानपटे, नीशा पाटील, सुनीता देशमुख, स्वाती टकुडगे, मनीषा भोंगाळे उपस्थित होत्या. अनिकेतन पवार यांनी सूत्रसंचालन केले. रमजान शेख यांनी आभार मानले. अध्यक्षा आरिफा मुजावर, उपाध्यक्षा शोभा माळी, अनुराधा पाटील, ऊर्मिला दशवंत, कीर्ती पवार यांनी नियोजन केले.

Web Title: Family empowerment if women's health improves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.