कोरोना न होण्याची काळजी कुटुंबाने घेतली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:29+5:302021-06-06T04:20:29+5:30
इस्लामपूर : कोरोना महामारीचा फटका गावागावातील लहान मुलांना,सामान्य कुटुंबाला जास्त बसला आहे. प्रत्येक कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली ...
इस्लामपूर : कोरोना महामारीचा फटका गावागावातील लहान मुलांना,सामान्य कुटुंबाला जास्त बसला आहे. प्रत्येक कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. कोरोना न होण्याची काळजी प्रत्येक कुटुंबाने घेतली पाहिजे असे प्रतिपादन दुधारीच्या सरपंच अर्चना पोळ यांनी केले.
दुधारी ग्रामपंचयातच्यावतीने स्थापन केलेल्या कोरोना विलगीकरण कक्षाचे उदघाटन पोळ यांच्याहस्ते झाले. यावेळी उपसरपंच दीपक लकेसर उपस्थित होते.
पोळ म्हणाल्या, आपण कोरोनाला हद्दपार करण्यात यशस्वी होत आहोत. परंतु अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही. काही घरात कुटुंबातील लोकांची संख्या जास्त असल्याने व त्यामधील एखादा पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण कुटुंबास बाधा होऊ शकते. त्यामुळे अलगीकरण कक्षात वास्तव्य करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, सुशील सावंत, इरफान मुजावर, भगवान काबुगडे, प्रदीप पोळ, बाळासो जाधव, पोलीस नाईक संजय मासाळ, ग्रामसेवक अमर वाटेगावकर, कोतवाल सागर अडसूळे उपस्थित होते.
फाेटाे : ०५ इस्लामपुर १
ओळ : दुधारी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतच्या विलगिकरण कक्षाचे उदघाटन बाळासाहेब जाधव यांनी केले.यावेळी अर्चना पोळ,दीपक लकेसर,प्रदीप पोळ,उत्तम पाटील उपस्थित होते.