दुष्काळात बेदाणा शेडने अर्थचक्राला गती-दहा हजारावर शेड उभारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:25 AM2019-01-17T00:25:39+5:302019-01-17T00:27:11+5:30
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील मिरज-पंढरपूर राष्टÑीय महामार्गालगत कुचीपासून ते सांगोला हद्दीपर्यंत साधारणत: दहा हजार बेदाणा निर्मिती शेड उभी राहिली आहेत. बेदाणा निर्मितीस पोषक कोरडे व चांगल्या
जालिंदर शिंदे ।
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील मिरज-पंढरपूर राष्टÑीय महामार्गालगत कुचीपासून ते सांगोला हद्दीपर्यंत साधारणत: दहा हजार बेदाणा निर्मिती शेड उभी राहिली आहेत. बेदाणा निर्मितीस पोषक कोरडे व चांगल्या वातावणामुळे उत्कृष्ट बेदाणा निर्मिती या पट्ट्यात होते. या शेडमुळे दुष्काळातील मंदावलेले अर्थचक्र गतीने फिरू लागले आहे.
कवठेमहांकाळसह मिरज, खानापूर, जत, आटपाडी तालुक्यातील शेतकरी आपल्या द्राक्षांपासून बेदाणा निर्मितीसाठी येथील शेडचा उपयोग करतात. त्यामुळे स्थानिक लोकांनाही त्याचा चांगल्याप्रकारे रोजगार उपलब्ध होतो.जिल्ह्यात नगदी पीक म्हणून द्राक्षक्षेत्राची वेगाने मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही भागात निर्यातक्षम द्राक्ष पीकही घेतले जाते. द्राक्षापासून निर्माण केलेल्या बेदाण्यालाही चांगला दर मिळत असल्याने बºयाच शेतकºयांचा द्राक्षापासून बेदाणा निर्मिती करण्याकडे कल असतो. कुचीपासून ते सांगोल्यापर्यंत म्हणजे कुची, शेळकेवाडी, आगळगाव, हातीद, घोरपडी, चोरोची या भागात मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मितीची शेड उभारली जातात. हिरव्या रंगाच्या बेदाण्याच्या निर्मितीसाठी पोषक हवामान व चांगल्या वातावरणामुळे येथे मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मितीचा व्यवसाय होतो.
या पट्ट्यामध्ये पोषक वातावरणामुळे बेदाणा लवकर सुकतो व त्याला रंग चांगला येतो. वाहतुकीसाठी मिरज-पंढरपूर राष्टÑीय महामार्ग असल्याने त्याचा फायदा या व्यवसायाला होतो. काही वर्षापूर्वी काही प्रमाणात (नगण्य) असणारी बेदाणा शेड आता मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे येथे एकप्रकारे वसाहत निर्माण होत आहे.
वाहतुकीच्या सोयीमुळे राष्टÑीय महामार्गालगत असणाºया बेदाणा निर्मिती शेडला शेतकरी पसंती देत आहेत. त्यामुळे या परिसराला वसाहतीचे स्वरुप आले आहे. साधारण चार किलो द्राक्षांपासून एक ते दीड किलो बेदाणा तयार होतो. पुढे तयार होणाºया या बेदाण्याला दरही चांगला मिळतो. जानेवारी ते एप्रिलदरम्यान या व्यवसायात लाखो टन बेदाणा निर्मिती होते. या व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीही चांगल्या प्रकारे होते. ऐन उन्हाळ्यात दोन ते तीन महिने महिला व पुरुषांना चांगला रोगजार उपलब्ध होतो. शेड उभारणे, रॅकवर द्राक्षे टाकणे, द्राक्षे झाडणे, वॉश्ािंग करणे, पॅकिंग करणे अशा कामाची निर्मिती होत असल्याने रोजगारही उपलब्ध होत आहे.
मार्केटिंग गरजेचे : शीतगृहासाठी प्रयत्न व्हावेत
येथील बेदाण्यास देशाबरोबरच परदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे साहजिकच परराष्टÑातील शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात मिरज-पंढरपूर रस्त्यावर असणाºया बेदाणा शेडची संख्या लक्षात घेता, शासनाने मार्केटिंगची सोय उपलब्ध करून दिल्यास ती फायदेशीर ठरणार आहे.
शीतगृह उभारून सवलतीच्या दरात शेतकºयांना दिल्यास त्याचा चांगला फायदा होणार आहे. तसेच वाहतुकीचा होणारा खर्चही त्यामुळे वाचणार आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपेक्षा चालूवर्षीपासूनच बेदाणा न झाल्याने, त्याचा फटका द्राक्ष उत्पादनावर झाल्याने आपसूकच त्याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर झाला आहे.
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांदरम्यान येथे लाखो टन बेदाणा तयार होतो. परंतु येथे शीतगृहाची सोय नसल्याने शेतकºयांना बेदाणा साठविण्यासाठी सांगली, मिरज, तासगाव येथे तो स्टोेअर करावा लागतो. त्यामुळे ते सर्वचदृष्टीने खर्चिक असल्याने शासनाने सवलतीच्या दरात येथेच शीतगृहे उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा शेतकºयांना होणार आहे.
- संतोष पवार (पाटील)