मराठीतील कोहिनूर ए गझल 'इलाही जमादार' यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 01:19 PM2021-01-31T13:19:56+5:302021-01-31T13:34:58+5:30

इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही जमादार यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला.

Famous ghazal singer Ilahi Jamadar passes away in sangli | मराठीतील कोहिनूर ए गझल 'इलाही जमादार' यांचं निधन

मराठीतील कोहिनूर ए गझल 'इलाही जमादार' यांचं निधन

googlenewsNext

सांगली/मुंबई - मराठी गझल विश्वाला आपल्या लेखणीने समृद्ध करणाऱ्या इलाही जमादार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे, ते 75 वर्षांचे होते. सांगलीजवळच्या दूधगावात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून इलाही जमादार आजाराने त्रस्त होते. त्याच्या जाण्याने गझल रसिकांमध्ये शोककळा पसरली आहे. मराठीतील गझल ए-कोहिनूर असंही त्यांना म्हटलं जायचं.

इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही जमादार यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठीची गझल कार्यशाळा ते घ्यायचे. 

इलाही जमादार हे महाराष्ट्रातील अनेक शहरांत आणि व महाराष्ट्राबाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी गझलांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम करायचे. इलाही यांनी 'जखमा अशा सुगंधी' आणि 'महफिल-ए-इलाही' या नावांचे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम केले आहेत. 

अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा,
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा.... 
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला,
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा... 

इलाहींची ही गझल भीमराव पांचाळे प्रत्येक कार्यक्रमात आवर्जुन घेत असत.

Web Title: Famous ghazal singer Ilahi Jamadar passes away in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.