आरवडेत शेतक-याने तोडली द्राक्षबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 03:53 PM2019-11-18T15:53:56+5:302019-11-18T15:55:19+5:30

द्राक्षबागेच्या छाटणीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने घड कुजले. सर्व बागेत आलेल्या   दावण्या, करपा रोगाने बाग वाया गेली. बागेत दलदल निर्माण झाल्यामुळे औषध मारणे सुद्धा शक्य नव्हते. त्यामुळे शेतकरी निराश होता. माल नसल्यामुळे यापुढे द्राक्षबाग सांभाळणे अवघड आहे, हे ओळखून या शेतक-याने कु-हाडीने सर्व बागच तोडून टाकली आहे.

A farmer breaks a vineyard in Arvad | आरवडेत शेतक-याने तोडली द्राक्षबाग

आरवडेत शेतक-याने तोडली द्राक्षबाग

Next
ठळक मुद्देद्राक्षबागेच्या छाटणीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने घड कुजले. सर्व बागेत आलेल्या   दावण्या, करपा रोगाने बाग वाया गेली.

मांजर्डे : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. मागील दोन महिन्यापासून बागेत पाणी साचल्यामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. झाडावरील सर्वच माल गळून बागच वाया गेल्यामुळे आरवडे (ता. तासगाव) येथील उत्तम दत्तात्रय पाटील यांनी आपली बाग तोडली आहे.

आरवडे येथे उत्तम दत्तात्रय पाटील यांची गोटेवाडी रस्त्याला लोंटबी डोंगरानजीक एक एकर सोनाक्का वाणाची द्राक्षबाग आहे. बागेच्या छाटणीनंतर झाडांवर सरासरी ५० घड आले होते. मागील दोन महिन्यांपासून या भागात सतत पाऊस कोसळत आहे. यामुळे बागेत सर्वत्र पाणी साचले होते.

द्राक्षबागेच्या छाटणीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने घड कुजले. सर्व बागेत आलेल्या   दावण्या, करपा रोगाने बाग वाया गेली. बागेत दलदल निर्माण झाल्यामुळे औषध मारणे सुद्धा शक्य नव्हते. त्यामुळे शेतकरी निराश होता. माल नसल्यामुळे यापुढे द्राक्षबाग सांभाळणे अवघड आहे, हे ओळखून या शेतक-याने कु-हाडीने सर्व बागच तोडून टाकली आहे. यामुळे या शेतक-याचे सुमारे सात लाखाचे नुकसान झाले आहे. बागेसाठी औषधे, मजुरी, खते यासाठी खर्च केला होता, तो सुद्धा वाया गेला. पाऊस व रोगांमुळे यापुढे आर्थिक नुकसान नको, म्हणून हृदयावर दगड ठेवून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.

दोनच दिवसांपूर्वी मांजर्डे    येथील सुभाष मोहिते या शेतक-याने एक एकर द्राक्षबाग तोडली होती. असेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने या भागातील आणखी   काही शेतकºयांनी आपल्या द्राक्षबागा तोडल्या आहेत.

Web Title: A farmer breaks a vineyard in Arvad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.