चिखली विद्युत धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:13+5:302021-03-20T04:24:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथे वारणा नदी काठावरील विद्युत मोटार सुरू करताना विजेचा धक्का बसून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: चिखली (ता. शिराळा) येथे वारणा नदी काठावरील विद्युत मोटार सुरू करताना विजेचा धक्का बसून आनंदा ज्ञानू भोसले (वय ४६, रा. नाटोली ) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या दरम्यान घडली.
आनंदा भोसले यांचे चिखली हद्दीत नदीजवळ विद्युत मोटारीचे कनेक्शन आहे व नाटोली येथे मळीचे शेत या भागात ऊस शेती आहे. या उसास पाणी पाजण्यासाठी शुक्रवारी पहाटे पाचच्या दरम्यान ते गेले होते. सकाळी साडे नऊच्या दरम्यान काही नागरिकांना आनंदा भोसले हे विद्युत मोटारजवळ मृतावस्थेत दिसले.
याठिकाणी विद्युत मोटार चालू करताना त्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला असल्याचे दिसून आले.
डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी शवविच्छेदन केले असून त्यांनी मयत आनंदा भोसले यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असल्याचे सांगितले. याबाबत अशोक भोसले यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. हवालदार शिवाजीराव पाटील तपास करीत आहेत. आनंदा भोसले यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.