सोनहिरा कारखान्याचे शेतकरी सभासद प्रशिक्षणास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:30 AM2021-01-16T04:30:40+5:302021-01-16T04:30:40+5:30
वांगी: वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासद शेतकरी शेती प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. ...
वांगी:
वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासद शेतकरी शेती प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. हे प्रशिक्षण पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी सर्व शेतकऱ्यांना निरोप दिला.
मोहनराव कदम म्हणाले की, या प्रशिक्षण कालावधीमध्ये एकरी ऊस उत्पादन वाढ, विविध ऊस वाण जाती, ऊस लागवड प्रशिक्षण, खते – औषधे यांचा योग्य वापर तसेच संशोधन केंद्रावर शास्त्रज्ञांद्वारे सखोल माहिती, प्रात्यक्षिक दाखविले जाते. या ज्ञानाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपले शेतीमध्ये एकरी ऊस उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करावा. कारखान्यामार्फतदेखील एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी विविध ऊस विकास योजना राबविण्यात येतात.
यावेळी जनसंपर्क अधिकारी सयाजी जाधव, शेती अधिकारी प्रशांत कणसे, ऊस विकास अधिकारी मारुती जाधव व प्रशिक्षणार्थी सभासद उपस्थित होते.
फोटो-१५वांगी१