कर्जामुळे नागावकवठेत शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Published: April 5, 2016 12:48 AM2016-04-05T00:48:44+5:302016-04-05T00:48:44+5:30

विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या

Farmer suicides in NagaKavhat due to loan | कर्जामुळे नागावकवठेत शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जामुळे नागावकवठेत शेतकऱ्याची आत्महत्या

Next


कवठेएकंद : नागावकवठे (ता. तासगाव) येथील अभय जयपाल बिरनाळे (वय २८) या युवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी घडली.
बिरनाळे यांनी गतवर्षापासून द्राक्षबाग उभारणी केली होती. यावर्षी वातावरणामुळे द्राक्षबाग वाया गेल्याने ते मानसिक तणावाखाली होते. या तणावाखालीच त्यांनी शेतातच विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. आपण कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्यांच्याजवळ सापडली आहे. या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नागावकवठेच्या पूर्वेस अर्धा किलोमीटरवरच त्यांची द्राक्षबाग आहे. यावर्षी बागेतून काहीच उत्पन्न मिळाले नसल्याने ते चिंताग्रस्त बनले होते. बिघडलेले हवामान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे वाया गेलेली द्राक्षबाग पुन्हा उभारण्याचा प्रयत्न होत असतानाच, कर्जबाजारीपणामुळे बागेतच या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली.

 

Web Title: Farmer suicides in NagaKavhat due to loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.