शेतकऱ्याने कारली बाजारात नेऊन वाटली फुकट; दर पडल्याने हवालदिल, सांगलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 11:19 AM2021-09-07T11:19:45+5:302021-09-07T11:23:16+5:30
आज कवठेमहांकाळचा आठवडा बाजार आहे. तालुक्यात कारल्याचे उत्पादन यावर्षी चांगले झाले आहे.
सांगली: भाजीपाल्याचे दर पडल्याने आणि व्यापाऱ्यांकडून लूट सुरू असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने आज सकाळी शेतातील कारली कवठेमहांकाळ येथील बाजारात नेऊन फुकट वाटली. तालुक्यात भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी बेहाल झाला असून, व्यापारी कमी दरात खरेदी करून बाजारात ग्राहकाला चढ्या दराने विकत आहेत. यात व्यापारी मालामाल तर शेतकऱ्याचे हाल अशी अवस्था झाली आहे.
आज, मंगळवार कवठेमहांकाळचा आठवडा बाजार आहे. तालुक्यात कारल्याचे उत्पादन यावर्षी चांगले झाले आहे. मात्र दर नाही. त्यामुळे तालुक्यातील विठुरायाचीवाडी येथील युवा शेतकरी सागर दोडमिशे यांनी दीडशे किलो कारली अक्षरशः फुकट वाटली. कारले घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दोडमिशे यांनी बाजारात उभे राहून 'कारली घ्या फुकट' असा आवाज देत कारली वाटून टाकली.
सांगली: भाजीपाल्याचे दर पडल्याने आणि व्यापाऱ्यांकडून लूट सुरू असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने आज सकाळी शेतातील कारली कवठेमहांकाळ येथील बाजारात नेऊन फुकट वाटली. pic.twitter.com/3UxuJF0tTH
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2021