कारंदवाडीत शाश्वत शेतीबाबत शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:49 AM2021-02-18T04:49:02+5:302021-02-18T04:49:02+5:30
आष्टा : वाळवा तालुक्यातील कारंदवाडी-कृष्णानगर येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका अभियान शेतकरी प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...
आष्टा : वाळवा तालुक्यातील कारंदवाडी-कृष्णानगर येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका अभियान शेतकरी प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांनी माती नमुना महत्त्व, खतांचा समतोल वापर, सूक्ष्म मूलद्रव्ये वापर, तसेच गांडूळ युनिट व नाडेफ युनिट याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा मृद् अधिकारी सांगली अमित कवठेकर यांनी जमीन सुपीकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अनिल सरदेशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत यांनी कृषी विभागाच्या योजना व त्या राबविण्याची कार्यप्रणाली याविषयी माहिती दिली.
यावेळी यशवंत सरदेशमुख, दिनकर सरदेशमुख, दिलीप सरदेशमुख, संदीप कोकरे व कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक घाडगे, कृषी सहायक मकरंद कारंजकर, जी. पी. कांबळे, अश्विनी जैन व नागेश जमदाडे, सागर पाटील व कृषी सहायक सावित्री आटुगडे उपस्थित होत्या.
अनिल सरदेशमुख यांनी स्वागत केले, संदीप सावंत यांनी आभार मानले.
फोटो : १७०२२०२१-आयएसएलएम-आष्टा शेती न्यूज
कारंदवाडी कृष्णानगर येथे शाश्वत शेतीबाबत शेतकरी प्रशिक्षणप्रसंगी तालुका कृषी अधिकारी भगवान माने, मृद् अधिकारी अमित माने, ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, अनिल सरदेशमुख उपस्थित होते.