विजापूर-गुहागर मार्गासाठी शेतकऱ्यांचे पलूसमध्ये आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:27 AM2021-03-23T04:27:23+5:302021-03-23T04:27:23+5:30
शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर जाधव म्हणाले, या रस्त्यास शेतकऱ्यांनी कधीच विरोध केलेला नाही. योग्य मोबदला द्यावा व पूर्ण रुंदीचा ...
शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर जाधव म्हणाले, या रस्त्यास शेतकऱ्यांनी कधीच विरोध केलेला नाही. योग्य मोबदला द्यावा व पूर्ण रुंदीचा व पूर्ण क्षमतेचा रस्ता तयार करण्यात यावा, यासाठी शेतकरी आग्रही आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आडमुठ्या धोरणामुळे सध्या रस्त्याची वाताहत झाली आहे. शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी मोजणीचे आदेश दिलेले होते. त्यानुसार मोजणी प्रक्रिया चालूच आहे. परंतु या काळात रस्त्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याने या कालावधित जनतेला चांगला सर्व्हिस रोड देणे बंधनकारक असताना सुद्धा, याकडे मुद्दाम राष्ट्रीय महामार्ग विभाग व कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहेत. शेतकऱ्यांना रस्ता अडविल्याबाबत दोष देत आहेत. या सर्व रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेस सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदार जबाबदार आहेत. शेवटच्या शेतकऱ्याला मोबदला मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.
या आंदोलनात मारुती चव्हाण, पोपट संकपाळ, विनायक गोंदिल, प्रकाश पाटील, सत्यवान संकपाळ, अरविंद वाघमारे, विनायक मोहिते, नूर मोहम्मद, महेंद्र कांबळे, प्रताप चव्हाण, श्रीकांत जाधव, अरुण पाटील यांनी सहभाग घेतला.
कोट
शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर सकारात्मक निर्णय झाला आहे. येत्या दोन आठवड्यात प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या रस्त्याचे काम मार्गी लागेल.
- अरुण लाड, आमदार