ं‘म्हैैसाळ’च्या बिलाचा भार शेतकºयांवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:08 AM2017-09-18T01:08:55+5:302017-09-18T01:08:55+5:30
सदानंद औंधे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : पाऊस नसल्याने टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळसह ताकारी, टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी टंचाई निधीतून वीजबिल भरण्याचे आश्वासन देत म्हैसाळचे आवर्तन सुरू केले; मात्र केवळ पिण्यासाठी मोफत पाणी सोडण्यात येत असून, म्हैसाळ योजनेच्या पाणीबिलाची शेतकºयांकडून वसुली करण्यात येणार आहे.
शेतीसाठी टंचाई निधीतून बिल भरण्याचे आश्वासन देणाºया मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप काँग्रेस व राष्टÑवादी नेत्यांनी केला आहे. पावसाळ्यात पाऊस नसल्याने द्राक्ष, ऊस व पेरणी झालेल्या पिकांना पाणीटंचाई जाणवू लागल्याने आॅगस्ट महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याची शेतकºयांची मागणी होती. टंचाई निधीतून वीजबिल भरून म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजना सुरू करण्याच्या जिल्ह्यातील आमदारांच्या मागणीबाबत मुंबईत बैठक होऊन मुख्यमंत्र्यांनी म्हैसाळ, ताकारी व टेंभू या सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. २८ कोटी वीजबिल थकीत असल्याने म्हैसाळ योजनेचा विद्युत पुरवठा खंडित होता. गतवर्षी टंचाई परिस्थितीमुळे तीन साखर कारखान्यांनी तीन कोटी रुपये व शेतकºयांनी ३० लाख रुपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजना सुरू झाली होती.
यावर्षी म्हैसाळच्या आवर्तनासाठी टंचाई निधीतून थकीत वीजबिल भरण्याच्या आश्वासनामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला. एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महावितरणने विद्युत पुरवठा सुरू केल्यानंतर म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील बागायती पिकांना पाणी उपलब्ध झाले; मात्र म्हैसाळच्या वीजबिलाची थकबाकी टंचाई निधीतून भरण्यात आलेली नसून, शेतकºयांकडून पाणीपट्टी वसुलीसाठी पिकांची मोजणी सुरू करण्यात येणार असल्याचे म्हैसाळच्या अधिकाºयांनी सांगितले. म्हैसाळचे आवर्तन पुढे सुरू ठेवण्यासाठी शेतकºयांकडून पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून, सुमारे २५ लाख रुपये जमा झाले आहेत. टंचाई निधीतून थकीत वीजबिल न भरता मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या ठिकाणी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डोंगरवाडी योजना : पाणी सोडण्याची मागणी
म्हैसाळचे आवर्तन सुरू होऊन महिना झाल्यानंतरही म्हैसाळ योजनेवरील डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले नसल्याने डोंगरवाडी, कळंबी, सिध्देवाडी, पाटगाव, सोनी, भोसे, करोली-एम, खंडेराजुरी, गुंडेवाडी ही गावे म्हैसाळच्या पाण्यापासून अद्याप वंचित आहेत. डोंगरवाडीचे पाणी सोडण्यासाठी कळंबी, सोनी, भोसे परिसरातील शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. डोंगरवाडी योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरू असल्याने डोंगरवाडी योजनेतून अद्याप पाणी सुरू करण्यात आले नसल्याचे म्हैसाळच्या अधिकाºयांनी सांगितले.