शेतकऱ्यांनो विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:20+5:302020-12-23T04:23:20+5:30
कुपवाड : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने अतिशय चांगला असा कृषी सुधारणा कायदा लागू केला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे भले होणार ...
कुपवाड : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने अतिशय चांगला असा कृषी सुधारणा कायदा लागू केला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे भले होणार आहे. त्यामुळे या कायद्याविषयी विरोधी पक्षांनी पसरविलेल्या गैरसमजाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन मंगळवारी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.
बामणोली (ता. मिरज) येथे शेतकऱ्यांना हा कायदा समजावा व त्यांचा गैरसमज दूर व्हावा या हेतूने आमदार सुधीर गाडगीळ यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कायदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी संपूर्ण कृषी कायदा सांगणारी पुस्तिका आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते शेतकऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनीही शेतकऱ्यांना कायद्याविषयी माहिती दिली.
भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राज्य चिटणीस अश्रफ वांकर यांनी कायद्याविषयी विरोधक पक्षाकडून करण्यात येणाऱ्या राजकारणाविषयी स्पष्टीकरण दिले. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे रावसाहेब ऐतवडे यांनी शेतकरी सबलीकरण, संरक्षण हमीभाव, कृषिसेवा करार, कृषी उत्पादन व्यापार या विषयीच्या शंंकांचे निरसन केले. भाजपचे सांगली ग्रामीण मंडळ अध्यक्ष संतोष सरगर यांनी स्वागत केले.
बैठकीस भाजपचे नगरसेवक प्रकाश ढंग, सरचिटणीस विश्वजित पाटील, बामणोलीचे सरपंच राजेश संनोळी, दीपक माने, विष्णू लवटे, अर्चना पाटील, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, सतीश राजावत, ॲड. संजय ढोले, हणमंत पाटील, संभाजी पाटील, महावीर रेवाणा, विजय रेवांणा, राजू संगमे, भरत संगमे, रावसाहेब ढोले, अनिल रेवांणा, सुशांत पाटील, निखिल पाटील, सुनील ढोले आदी उपस्थित होते.
फोटो : २२ कुपवाड ०२
ओळ : बामणोली (ता. मिरज) येथे शेतकरी कायद्याच्या समर्थनार्थ आमदार सुधीर गाडगीळ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. यावेळी दीपक शिंदे, प्रकाश ढंग, विश्वजित पाटील, बामणोलीचे सरपंच राजेश संनोळी उपस्थित होते.