चिंचणी ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:36 AM2020-12-30T04:36:59+5:302020-12-30T04:36:59+5:30

चिंचणी येथील जुना वांगी रस्ता नकाशात आहे. मात्र, या रस्त्यावर कच्या बांधकामाच्या झोपड्या बांधून रस्ता बंद केला आहे. त्यातील ...

Farmers fast in front of Chinchani Gram Panchayat | चिंचणी ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांचे उपोषण

चिंचणी ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांचे उपोषण

Next

चिंचणी येथील जुना वांगी रस्ता नकाशात आहे. मात्र, या रस्त्यावर कच्या बांधकामाच्या झोपड्या बांधून रस्ता बंद केला आहे. त्यातील काही अतिक्रमणधारकांची जागा गावात असताना शासकीय जागेत अतिक्रमण केले आहे. ग्रामपंचायतीने अनेक लोकांच्या नोंदी घेतल्या आहेत. रस्त्यांवरील अतिक्रमण काढावे, अशी माळी यांनी मागणी केली आहे.

प्रशासकीय सूचनांचे पालन करू : सरपंच मनीषा माने

अतिक्रमण काढण्याबाबत

महसूल प्रशासन व गटविकास अधिकारी यांच्याकडून रितसर कार्यवाही व्हावी व मार्गदर्शन मिळावे, यासाठी लेखी पत्र दिले आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे व कायद्याचे पालन करण्यास आम्ही बांधील आहोत, असे सरपंच मनिषा माने यांनी सांगितले.

फोटो ओळ : ‘अतिक्रमण हटाव’च्या मागणीसाठी चिंचणी येथील ग्रामपंचायतीसमोर उपोषणास बसलेले ज्ञानदेव माळी व अन्य.

Web Title: Farmers fast in front of Chinchani Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.