उडीद खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:13 PM2018-11-13T23:13:13+5:302018-11-13T23:13:19+5:30
सांगली : राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत किमान आधारभूत किमतीला उडीद खरेदी केंद्र दि. ३१ आॅक्टोबर रोजी ...
सांगली : राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत किमान आधारभूत किमतीला उडीद खरेदी केंद्र दि. ३१ आॅक्टोबर रोजी सुरू करण्यात आले. पण या खरेदी केंद्राकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे. कारण हमीभाव पाच हजार ६०० रूपयांचा आहे, तर बाजारात उडीद पाच हजार ५०० रूपयांनी खरेदी केले जात आहे. त्यामुळे शेतकºयांनी व्यापाºयांनाच पसंती दिल्याचे चित्र आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विष्णुअण्णा खरेदी-विक्री संघाची उडीद हमीभाव खरेदी केंद्र म्हणून नियुक्ती केली आहे. या ठिकाणी उडीद खरेदी करण्यासाठी सोमवारी ३० शेतकºयांना एसएमएस पाठविण्यात आले, मात्र त्यापैकी फक्त तीन शेतकºयांनी उडीद विक्रीसाठी आणले होते. त्यामुळे खरेदी केंद्राकडे शेतकºयांनी पाठ फिरविली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खरेदी केंद्रावर शेतकºयांना एसएमएस पाठविण्यात येतो. त्यानंतर शेतकरी एक किलोचे सॅम्पल दाखवितात. त्यावर दर निश्चित होतो. त्यानंतर शेतकºयाचा माल घेतला जातो. घेतलेल्या मालासाठी शेतकºयांना शासनाकडून तब्बल एक ते दीड महिना थांबावे लागते. दुसरीकडे हमीभाव केंद्रावर ५ हजार ६०० रुपये दर असताना, व्यापाºयांकडे मात्र ५ हजार ५०० रूपयांचा दर असल्यामुळे, शासनाकडे उधारीवर माल घालण्यापेक्षा व्यापाºयांकडे रोखीने माल देणे शेतकºयांनी पसंत केले आहे.
रोकड व्यवहाराकडे शेतकºयांचा कल
हमीभाव खरेदी केंद्रावर उडीद प्रति हेक्टर २९८ किलो घेतला जातो. तसे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. मात्र काही शेतकºयांचा माल यापेक्षाही जास्त असतो. तो खरेदी केंद्रावर खरेदी केला जात नाही. त्यामुळे त्यापेक्षा व्यापाºयांकडे हवा तेवढा माल अवघ्या शंभर रूपयांच्या फरकाने रोखीत घेतला जात असल्याने, हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे. शेतकºयांनी व्यापाºयांनाच पसंती दिल्याचे चित्र आहे.