शेतकऱ्यांनी ‘पाटबंधारे’त फायली भिरकावल्या, ‘म्हैसाळ’चा पाणी प्रश्न पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:35 PM2018-04-21T23:35:17+5:302018-04-21T23:35:17+5:30
सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे पाणी टंचाई असून, द्राक्षबागाही वाळू लागल्यामुळे मालगावातील शेतकऱ्यांनी शनिवारी सांगली (वारणाली) येथील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे यांना जाब विचारत कार्यालयातील फायली भिरकावून दिल्या. अधिकारी आणि शेतकºयांमध्ये वादावादी झाली. संजयनगर पोलीस ठाण्याचा फौजफाटा आल्यानंतर शेतकरी आणि अधिकाऱ्यांतील वादावर पडदा पडला.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुणावरही गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले. मालगावच्या शेतकऱ्यांनीही सुमारे सात लाख रुपये जमा केले आहेत.
मात्र वेळेत पाणी मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या सुरू आहेत. बागा फुलण्यासाठी सध्या पाण्याची गरज आहे. पाणी वेळेत न मिळाल्यास बागा वाया जाऊन शेतकºयांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. शासनाकडून निधी मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. यामुळे मालगाव परिसरातील शेतकरी अस्वस्थ होते. पाणी वाटपाची जबाबदारी योजनेच्या अधिकाºयांकडे असताना ते नदीजवळील योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांना योजनेच्या पाण्यापासून वंचित ठेवून जतकडे पाणी नेण्याच्या नियोजनात गुंतले आहेत.
कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडले असले तरी, अधिकाºयांच्या नियोजनाअभावी पाणी पुढे सरकत नाही. पैसे भरूनही वेळेत पाणी मिळत नसल्याने शेतकºयांनी यापूर्वी दोनवेळा म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी पाण्याची उपलब्धता नसल्याने सध्या कळंबी शाखा कालव्यात पाणी सोडण्यात अडचणी असल्याची जुजबी उत्तरे अधिकारी देत होते. तसेच सध्या वारणेतून पाणी सोडण्यात आले अहे. मंगळवार, दि. १६ एप्रिलपर्यंत मालगावपर्यंत पाणी पोहोचेल, असे आश्वासन दोन्हीवेळा अधिकाºयांनी दिले असले तरी, अधिकाºयांचे ढिसाळ नियोजन व पाणी सोडण्याबाबत दिल्या जाणाºया खोट्या अश्वासनांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गाव बंदचा निर्णय घेतला होता. तरीही ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयाकडून मालगाव परिसरात पाणी सोडले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.
मालगाव येथील चाळीसहून अधिक शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सांगली येथील वारणालीमधील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यालयात येऊन अधिकारी आणि कर्मचाºयांना पाणी टंचाईबाबत जाब विचारला. अधिकारी उडवा-उडवीची उत्तर देऊ लागल्यामुळे त्यांनी कार्यालयातील फायलीच भिरकावल्या. कागदपत्रे सर्वत्र फेकल्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांमध्ये तणावाचे वातावरण होते. अखेर अधिकाºयांनी संजयनगर पोलीस स्टेशनला कल्पना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदिवे हे पोलिसांची कुमक घेऊन हजर झाले.
त्यांनी शेतकऱ्यांना शांत करून शांततेच्या मार्गाने मागण्या करण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलक शेतकरी तेथून निघून गेले. दरम्यान, या गोंधळाबद्दल पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी कुणावरही गुन्हा नोंद केला नसल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी संयम ठेवावा : नलवडे
ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सर्व शेतकºयांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वच शेतकºयांनी पैसे भरले असल्यामुळे प्रत्येकाला पाणी दिले जाणार आहे. तरीही मालगाव येथील प्रदीप सावंत यांच्यासह चाळीस शेतकºयांनी वारणाली येथील आमच्या कार्यालयात येऊन धिंगाणा घातला आहे. फायली भिरकावल्या असून, कार्यालयाचे नुकसानही केले आहे. पाणी टंचाई सर्वत्र असून, शेतकऱ्यांनी संयमाने आंदोलन केले पाहिजे. शेतकºयांचे आंदोलन असल्यामुळे कुणावरही गुन्हा दाखल केला नाही, असेही त्यांनी सांगितले.