शेतकऱ्यांना थेट मदतीचे धोरण हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:39+5:302021-01-03T04:27:39+5:30
शिराळा : शेतीला जोडउद्योग म्हणून दूध व्यवसाय फायदेशीर ठरला असून, ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. केंद्र ...
शिराळा : शेतीला जोडउद्योग म्हणून दूध व्यवसाय फायदेशीर ठरला असून, ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने या व्यवसायाकडे अधिकचे लक्ष देऊन शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचे धोरण अवलंबले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले.
देववाडी (ता. शिराळा) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशमुख म्हणाले, वारणा नदीच्या काठावरील गावांमध्ये पहिल्यापासून दूध व्यवसायाला चालना मिळत आहे. दूध संस्थादेखील दूध उत्पादकांच्या विश्वासास पात्र राहत चांगले काम करत आहेत. त्याचा फायदा उत्पादकांना होत आहे.
यावेळी संभाजी खोत, सचिन नांगरे, धनाजी नरूटे, बाबासाहेब वरेकर, विलास पाटील, दिलीप खोत, सतीश काटे, युवराज खोत, संजय खोत, राजेंद्र खोत, आदित्य खोत, ग्रामसेवक संदीप कुंभार, शिवाजी मोरे उपस्थित होते.