शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

By admin | Published: February 15, 2016 11:39 PM2016-02-15T23:39:57+5:302016-02-16T00:10:56+5:30

काडसिद्धेश्वर महाराज : आष्टा येथे ‘जयंत अ‍ॅग्रो’ प्रदर्शनाचे उद्घाटन

The farmers need to turn to sustainable agriculture now | शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज

Next

आष्टा : भारतीयांनी सेंद्रीय शेतीला फाटा देऊन रासायनिक शेतीला प्राधान्य दिल्याने प्रती किलोमागे २७ मिलिग्रॅम विष अन्नातून जात आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी होत असल्याने शाश्वत शेतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी देशी गाय पाळावी, असे प्रतिपादन कणेरी मठाचे अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांनी केले.
आष्टा (ता. वाळवा) येथे माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘जयंत अ‍ॅग्रो २०१६’ या राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काडसिध्देश्वर महाराज बोलत होते. माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंतराव पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आ. विलासराव शिंदे, मानसिंग पाटील, विश्वास पाटील, रामराव देशमुख, अशोका अ‍ॅग्री सोल्युशनचे सतीश पाटील, नंदकुमार पाटील, पी. आर. पाटील, बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे उपस्थित होते.
काडसिध्देश्वर महाराज म्हणाले की, पंचवीस वर्षांपूर्वी जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीतील पाणी धरुन ठेवण्याची क्षमता २५ टक्के होती. सध्या ती ३ टक्के झाली आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढविले नाही, तर पुढील पिढी माफ करणार नाही. शेतकऱ्याने बांधावरची शेती न करता शेतातील मातीला, पिकाला आवश्यक असणारे घटक शोधून वेळेवर द्यावेत. शेतातील जिवाणूंची संख्या घटत चालली आहे. मातीतील विष संपवण्याचे काम गाईचे शेण करते.
मानसिंगराव नाईक, दिलीप पाटील, विलासराव शिंदे यांनी, जयंत अ‍ॅग्रो कृषी प्रदर्शनामुळे शेतीबाबत योग्य दिशा मिळाली असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी स्वागत केले, तर बाजार समितीचे सभापती आनंद पाटील यांनी आभार मानले. यावेळी झुंझारराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, बाळासाहेब वाडकर, वैभव शिंदे, अशोक वग्याणी, उदय कुशिरे, सुनीता माने, संग्राम फडतरे, मोहन गायकवाड, प्रभाकर जाधव, रघुनाथ जाधव, जितेंद्र शिंदे, अनिल रूकडे, श्रीकांत कबाडे, डॉ. तुषार कणसे, सुरेश कबाडे, पपाली कचरे, विजय मोरे, समीर लतीफ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The farmers need to turn to sustainable agriculture now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.