शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:26+5:302020-12-16T04:40:26+5:30
वाळवा : शासनाने अतिवृष्टी व महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जे माफ केली. दोन लाखांवरील कर्जे असणाऱ्यांना भरायला ...
वाळवा : शासनाने अतिवृष्टी व महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जे माफ केली. दोन लाखांवरील कर्जे असणाऱ्यांना भरायला सांगून त्यांच्या अनुदानाबाबत निर्णय घेऊ, असे जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कर्जे स्वत: भरली; पण अद्याप शासन त्याच्या अनुदानाबाबत उदासीन आहे. हे अनुदान लवकरात लवकर मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.
कोरोना, डेंग्यू, चिकुणगुन्यासारखे साथीचे आजार फैलावले असतानाही शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील कर्जे अनेक व्याप करून भरली आहेत. परंतु शासनाने याचे अनुदान देण्यास टाळाटाळ चालवली आहे. अनुदानाचे गाजर दाखवून कर्जे भरायला सांगितले; पण अनुदान न मिळाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. शासनाने याची दखल घेऊन ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत आहे.