शासकीय योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:14+5:302021-09-23T04:30:14+5:30

शिराळा : वनविभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना कौतुकास्पद असून शेतकऱ्यांसाठी सोईच्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ...

Farmers should take advantage of government schemes | शासकीय योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

शासकीय योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

Next

शिराळा : वनविभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना कौतुकास्पद असून शेतकऱ्यांसाठी सोईच्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

मणदूर ( ता. शिराळा) येथे वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रदिप्तीशिल दिवे व सोलर कुपन युनिट वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार नाईक म्हणाले की यापुढेही शासन दरबारी चांदोली पर्यटनसाठी व शेतकऱ्यांच्या शेती पीक नुकसान भरपाईसाठी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही दिली.

वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी वन्य प्राण्यापासून शेती पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रदिप्तीशिल दिवे व सोलर कुंपण उपकरणांचे वाटप करण्यात येत आहे. असे सांगितले.

यावेळी वनपाल एच. ए. गारदी, जे. बी. महाडीक, सरपंच वसंत पाटील, सावळा पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Farmers should take advantage of government schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.