म्हैसाळ योजनेच्या पोटकालव्याचे काम शेतक-यांनी बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:31+5:302021-01-23T04:27:31+5:30
बेडगमध्ये म्हैसाळ सिंचन योजनेच्या पोटकालव्याचे काँक्रिटीकरणाचे काम जमिनीच्या मोबदल्यासाठी बंद पाडले लोकमत न्यूज नेटवर्क टाकळी : बेडग येथे म्हैसाळ ...
बेडगमध्ये म्हैसाळ सिंचन योजनेच्या पोटकालव्याचे काँक्रिटीकरणाचे काम जमिनीच्या मोबदल्यासाठी बंद पाडले
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी : बेडग येथे म्हैसाळ सिंचन योजनेच्या कळंबी पोटकालव्याच्या काँक्रिटीकरणाचे काम शेतक-यांनी शुक्रवारी बंद पाडले. कालव्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला २० वर्षांपासून मिळाला नसल्याचे सांगत शेतकरी आक्रमक झाले. पैसे मिळेपर्यंत काम सुरू करू दिले जाणार नाही, असा इशारा दिला.
पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी शेतक-यांची बाजू जाणून घेतली. पण, शेतकरी मोबदल्यावर ठाम राहिले. दोहोंत बराच वादही झाला. अधिका-यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे शेतकरी आणखी आक्रमक झाले. त्यानंतर, मात्र अधिकारी नरमले. भूसंपादन व मोबदल्याच्या कागदोपत्री प्रक्रियेची माहिती घेण्याचे आश्वासन दिले. दोन महिन्यांत पैसे शेतक-यांंना मिळतील, असे हमीपत्र देण्याची ग्वाही दिली. तत्पूर्वी काम पूर्ण होऊ दे, अशीही रदबदली केली. पण, शेतकरी अडून राहिले.
तुकाराम थोरवे, संजय नागरगोजे, केशव ओमासे, सुनील ओमासे, बी.के. कांबळे, पिंटू बोरगावे, संतोष कोळी, राजू थोरवे, अमोल शिरोटे, सुभाष इचल, स्वप्नील इचल, अरुण वणवे, आबासाहेब ओमासे, गोविंद ओमासे, रवींद्र शेळके, शिवराम शेळके, विकास कांबळे, सुधीर कांबळे, अलंकार कांबळे, शरद थोरवे, संदीप कांबळे, प्रकाश कांबळे, सिद्धू थोरवे, कृष्णा हांगे, तानाजी थोरवे या शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अधिका-यांना काढता पाय घ्यावा लागला.
---------