आॅनलाईन सात-बारा नोंदणी ठप्प झाल्याने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:19 PM2019-04-06T16:19:18+5:302019-04-06T16:20:42+5:30

जत तालुक्यातील महसूल खात्याचे आॅनलाईन सात-बारा नोंदणी करण्याचे काम ठप्प झाले आहे. याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सात-बारा उताºयावरील नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याने व त्याचे उतारे शेतकºयांना वेळेत न

Farmers suffer due to online seven-bar registration jam | आॅनलाईन सात-बारा नोंदणी ठप्प झाल्याने शेतकरी त्रस्त

आॅनलाईन सात-बारा नोंदणी ठप्प झाल्याने शेतकरी त्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाने यंत्रणा राबवली; परंतु सोय होण्याऐवजी गैरसोय मोठ्या प्रमाणात झाली आहे, अशी तक्रार शेतकरी करत आहेत.

 

जत : जत तालुक्यातील महसूल खात्याचे आॅनलाईन सात-बारा नोंदणी करण्याचे काम ठप्प झाले आहे. याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सात-बारा उताºयावरील नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याने व त्याचे उतारे शेतकºयांना वेळेत न मिळाल्यामुळे तालुक्यातील सुमारे पन्नास टक्के शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, अशी तक्रार जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

आॅनलाईन काम ठप्प झाल्यामुळे गावकामगार तलाठी कार्यालयातील शेतजमिनीची खरेदी, पिकाच्या नोंदी, वारसाचे बक्षीसपत्र, हक्क सोडपत्र, विहीर व बोअर नोंदी, बँक बोजा, ई-करार, बोजा चढविणे अशी कामे प्रलंबित राहीली आहेत. जोपर्यंत आॅनलाईन उताºयातील दोष दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे हस्तलिखित उतारे, ‘आठ अ’ उताºयाचे व्यवहार करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 
आॅनलाईन उताºयातील नोंदी करताना महसूल कर्मचाºयांनी चुका केल्या आहेत. परंतु त्याचा नाहक त्रास शेतकºयांना सहन करावा लागत आहे. संगणक प्रणालीमध्ये नोंदी व्यवस्थित होत नाहीत. अनेक शेतकºयांची नावे सात-बारा उताºयातून गायब झाली आहेत. त्यामुळे शेतकरी घाबरून गेले आहेत. सात-बारा उताºयातील नावाच्या नोंदी व्यवस्थित करून मिळाव्यात यासाठी तलाठी कार्यालयात शेतकरी दिवसभर ठिय्या मारून बसत आहेत. परंतु सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे नोंदीची प्रक्रिया एकदम मंद गतीने सुरू असते. त्यामुळे दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत नवीन नोंदी होत नाहीत.

गावकामगार तलाठी कार्यालयात संगणक आॅपरेटर नेमून तलाठी आॅनलाईन नोंदी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु संगणक आॅपरेटरना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील वर्षभर तलाठी कार्यालयात शेतकरी सात-बारा व आठ अ उताºयावरील नोंदी व्यवस्थित करून मिळाव्यात, यासाठी हेलपाटे मारत आहेत. आॅनलाईन उतारा देऊन शेतकºयांची सोय करण्यासाठी शासनाने यंत्रणा राबवली; परंतु सोय होण्याऐवजी गैरसोय मोठ्या प्रमाणात झाली आहे, अशी तक्रार शेतकरी करत आहेत.

Web Title: Farmers suffer due to online seven-bar registration jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.