कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्त्या

By admin | Published: March 10, 2017 02:23 AM2017-03-10T02:23:32+5:302017-03-10T02:24:00+5:30

जोरण : कर्जबाजारीपणाला कंटाळून सटाणा तालुक्यातील जोरण येथील नितीन जगन्नाथ बेडीस (२३) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली.

Farmer's Suicide Suffering Trouble | कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्त्या

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्त्या

Next


जोरण : कर्जबाजारीपणाला कंटाळून सटाणा तालुक्यातील जोरण येथील नितीन जगन्नाथ बेडीस (२३) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली.
नितीन बेडीस यांचे वडील एका हाताने अपंग असल्याने घरातील सर्व जबाबदारी नितीन यांच्यावरच होती. उसणवारीबरोबरच वाढलेला कर्जाचा डोंगर, त्यातच शेतीचे उत्पन्न घटल्याने पैशांची परतफेड करणे त्यांना अवघड झाले होते. त्यांच्यावर सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे कर्ज होते. दिवसेंदिवस कर्जाची रक्कम वाढतच चालली होती. याप्रकरणी किकवारी येथील पोलीस पाटील विश्वास देवरे, कारभारी म्हसदे यांनी पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली.

Web Title: Farmer's Suicide Suffering Trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.