Sangli: वारणा पाटबंधारे विभागाच्या पेठ येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 03:41 PM2023-11-24T15:41:59+5:302023-11-24T15:42:54+5:30
रेठरेधरण : रेठरेधरण, धुमाळवाडी व मरळनाथपुर, गावच्या शिवारात वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आली होती. याची ...
रेठरेधरण : रेठरेधरण, धुमाळवाडी व मरळनाथपुर, गावच्या शिवारात वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आली होती. याची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी वारणा पाटबंधारे विभागाच्या पेठ येथील कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले आहे.
रयत क्रांतीचे सागर खोत, डि.के.पाटील, अमोल पाटील यांच्या नेतत्त्वाखाली शेतकऱ्यांनी वारणा कालवे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा दिल्या. वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी शेतीला का सोडत नाही, जोपर्यंत पाणी सोडत नाही तोवर आम्ही येथून हलणार नाही असा शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
या आंदोलनात निलेश पाटील, बाबुराव लालासाहेब पाटील, बजरंग भोसले, पाटील ,प्रशांत पाटील, दिलीप पाटील, सतिश पाटील, संदिप पाटील, सनि पवार, जितेंद्र सुर्यवंशी, मोहसिन पटवेकर आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.