Sangli: ऊस दरावरुन शेतकरी संघटना आक्रमक, बहे-बोरगाव येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची हवा सोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 12:19 PM2024-11-26T12:19:40+5:302024-11-26T12:19:59+5:30

ऊसाला ४ हजार रूपये दर द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू : गणेश शेवाळे

Farmers union aggressive over sugarcane rate, sugarcane transport tractors left airborne in Sangli | Sangli: ऊस दरावरुन शेतकरी संघटना आक्रमक, बहे-बोरगाव येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची हवा सोडली

Sangli: ऊस दरावरुन शेतकरी संघटना आक्रमक, बहे-बोरगाव येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची हवा सोडली

इस्लामपूर : लाडक्या बहिणीला पैसे देता. निवडणुकीवर करोडो रुपये खर्च करतात. दिवाळीला शेतकऱ्याला उसाचे पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांची लूट का करता. येणाऱ्या गळीत हंगामाला ४ हजार रुपये दर आणि दुसरा हप्ता ५०० रुपये जाहीर करावा, अन्यथा महाराष्ट्रात ऊस आंदोलन तीव्र करू, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे यांनी दिला. यावेळी बहे-बोरगाव येथे उसाचे ट्रॅक्टर अडवून त्यातील हवा सोडण्यात आली.

विधानसभा निवडणूक पार पडताच बळिराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दक्षिण महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. ऊसतोड सुरळीत सुरू असताना बळिराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे यांनी बहे येथे ऊस आंदोलनाची ठिणगी टाकली. या आंदोलनात हसन मुल्ला, शहाजी पाटील, अशोक सलगर, आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers union aggressive over sugarcane rate, sugarcane transport tractors left airborne in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.