सांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 02:12 PM2019-12-04T14:12:46+5:302019-12-04T14:15:14+5:30

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर देशव्यापी लढा निश्चित करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी सांगलीत देशव्यापी शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद ...

Farmers' Union to hold a nationwide conference on 5th | सांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषद

सांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषद

Next
ठळक मुद्देसांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषदलढ्याची दीशा ठरणार: रघुनाथदादा पाटील

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर देशव्यापी लढा निश्चित करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी सांगलीत देशव्यापी शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, कापडविक्रीतून शेतकऱ्यांचे व भारतीयांचे शोषण करणाऱ्या ब्रिटीश सरकारविरुद्ध हुतात्मा बाबू गेणू यांनी १२ डिसेंबर १९३0 रोजी विदेशी कापडाने भरलेल्या ट्रकसमोर हौतात्म्य पत्करले होते. भारतीय शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक व शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून ओळखले जाणारे शरद जोशी यांनीही १२ डिसेंबर २0१५ रोजी शेवटचा श्वास घेतला होता. त्यामुळे याच तारखेस शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेस पंजाबचे शेतकरी नेते सतनाम सिंग, समशेरसिंह दहिया, कन्हैय्यालाल सिहाग, लालबहादूर शास्त्री यांचे वंशज संजयसिंह नाथ, तामिळनाडूचे देवसिंग मणी, नित्या मोहोर, आंध्रप्रदेशचे जनरल रेड्डी आदी उपस्थित राहणार आहेत. सांगलीच्या रेल्वे स्थानकाजवळील कल्पतरु मंगल कार्यालयात १२ डिसेंबरला दुपारी १ वाजता परिषद होणार आहे.

ऊसाला प्रतिटन चार हजार दर द्या, अन्यथा दोन कारखान्यांमधील अंतराची अटक काढून टाका, आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळाचा, महापुराचा समावेश करून जिरायत शेतीला एकरी ५0 हजार रुपये, बागायत शेतीला १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, गोवंश हत्या बंदी, वन्यजीव संरक्षण, पाळीव प्राण्यांशी निर्दयी वागणूक, आवश्यक वस्तू कायदा, भू-संपादन, कमाल जमीन धारणा इत्यादी शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेची पुनर्स्थापना करण्यात यावी, सरसकट सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे, शेतकऱ्यांना बाजाराचे, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळायला हवे, शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी, रेडी रेकनर प्रमाणे शेतीला कर्जपुरवठा करावा आदी मागण्यांची चर्चा या परिषदेत केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना देशव्यापी लढ्याची दिशाही निश्चित केली जाणार आहे. अशा अनेक परिषदांचे आयोजन वेगवेगळ््या ठिकाणी केले जाणार आहे. सांगलीत कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तरप्रदेश याठिकाणचे शेतकऱ्यांचे नेते उपस्थित राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची व क्रांतिकारी ठरणार आहे, असे पाटील म्हणाले.

Web Title: Farmers' Union to hold a nationwide conference on 5th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.