राज्यात शेतकरी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे : शहाजी गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:26+5:302021-01-01T04:18:26+5:30
ऐतवडे बुद्रुक : लहान शेतकरी व शेतमजूर यांना केंद्रबिंदू मानून योग्य कायदे करून शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता ...
ऐतवडे बुद्रुक : लहान शेतकरी व शेतमजूर यांना केंद्रबिंदू मानून योग्य कायदे करून शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता देशातील प्रत्येक राज्यात स्वतंत्र शेतकरी व शेतमजूर कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी लोकनेते राजारामबापू पाटील शेतकरी स्वयंसाहाय्यता बचत गटाचे संस्थापक शहाजी गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले की, लहान शेतकरी व शेतमजूर यांना केंद्रबिंदू मानून योग्य कायदे करून शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्याची गरज आहे. यासाठी स्वतंत्र शेतकरी व मजूर कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे गरजेचे आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.