तीन लाखावर शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण

By अशोक डोंबाळे | Published: August 5, 2023 05:48 PM2023-08-05T17:48:20+5:302023-08-05T17:48:54+5:30

नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, वादळ या काळात शेतकऱ्यांच्या शेतात लावलेल्या पिकाचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे शेतात लावलेले पीक वाया जाते.

Farmers will get crop insurance protection at Rs 3 lakh | तीन लाखावर शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण

तीन लाखावर शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण

googlenewsNext

सांगली : राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा दिला आहे. सांगली जिल्ह्यात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ८१७ टक्क्यांनी यात वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या नियोजनबद्ध कामामुळे होती. जिल्ह्यात पीकविमा मोठ्या प्रमाणात काढण्यात यश आले आहे.

नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, वादळ या काळात शेतकऱ्यांच्या शेतात लावलेल्या पिकाचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे शेतात लावलेले पीक वाया जाते. शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढला असेल तर त्यांना विमा कंपनीतर्फे विम्याच्या रूपात नुकसानभरपाई मिळते. शेतकऱ्याचे होणारे नुकसान यंदा फक्त एक रुपया भरून शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात विमा कंपनीद्वारे पीकविमा दिला जाणार आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पीकविम्याबाबत आवाहन करून ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे ३ लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी शासनाच्या पीकविमा योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

जिल्ह्यात खरीप २०२२ मध्ये कर्जदार शेतकरी आणि बिगरकर्जदार शेतकरी मिळून २५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला हाेता. यावर्षी एक रुपयात पीक वीमा असल्यामुळे विक्रमी तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत. जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार १९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. शेतकऱ्याचे एक रुपयाप्रमाणे ३ लाख ७६ हजार ५३० रुपये जमा झाले आहेत.

मोबाइल ॲपद्वारे नोंदणी

कृषी विभागाच्या अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी यांनी गावोगाव सीएससी केंद्र चालकाच्या मदतीने शिबिरे आयोजित केली होती. कृषी विभागाने स्वतः मोबाइल ॲपद्वारे नोंदणी करून घेतली. विमा कंपनीकडेही सतत पाठपुरावा केला. बँकासोबत वेळोवेळी बैठका घेऊन कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांची पीकविमा नोंदणी करून घेतली.
कोट
एक रुपयात पीक विमा उतरण्यात आला आहे. उर्वरित सर्व रक्कम केंद्र शासन भरणार आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांवर फारसा बोजा शासनाने टाकला नाही. यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी विविध पिकांचा पीक विमा उतरला आहे.
- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

Web Title: Farmers will get crop insurance protection at Rs 3 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली