कवठेमहांकाळ येथे कृषी कायद्याविरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:59+5:302021-02-05T07:17:59+5:30

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा निषेध म्हणून किसान संयुक्त मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण ...

Fasting against agricultural law at Kavthemahankal | कवठेमहांकाळ येथे कृषी कायद्याविरोधात उपोषण

कवठेमहांकाळ येथे कृषी कायद्याविरोधात उपोषण

Next

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा निषेध म्हणून किसान संयुक्त मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत कवठेमहांकाळमध्ये आंदोलन झाले. यावेळी दिल्लीतील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली.

देशामध्ये शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचे षड‌्यंत्र भारतीय जनता पार्टीने चालविले आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालवला आहे. तो सर्व शेतकऱ्यांनी हाणून पाडावा असे आवाहन बळिराजा पार्टीचे महासचिव बाळासाहेब रास्ते यांनी व्यक्त केले.

कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अविराजे शिंदे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर कांबळे यांनी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी प्रा. दादासाहेब ढेरे, अल्लबक्ष मुल्ला, बळिराजा पार्टीचे अध्यक्ष अंबादास जाधव, दिव्यांग संघचे शहाजी गोंधळे, बाळासाहेब पाटील, कॉंग्रेस सेवा दलाचे पोपटराव पाटील, चैतन्य पाटील, मुबारक मुल्ला, अंकुश रास्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

फोटो-३१शिरढोण१

फोटो ओळ : कवठेमहांकाळ (ता. जत) येथे कृषी कायद्यांच्या विरोधात रविवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले.

Web Title: Fasting against agricultural law at Kavthemahankal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.