श्रावणाचे उपवास महागाईने झाले अधिक कडक, देवपूजेच्या साहित्यालाही जीएसटीचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:33 PM2022-07-30T12:33:21+5:302022-07-30T12:33:54+5:30

फक्त उपवासच महागला असे नाही, तर देवपूजादेखील खर्चिक बनली

Fasting of Shravan has become stricter due to inflation, GST has also hit Devpooja materials | श्रावणाचे उपवास महागाईने झाले अधिक कडक, देवपूजेच्या साहित्यालाही जीएसटीचा झटका

श्रावणाचे उपवास महागाईने झाले अधिक कडक, देवपूजेच्या साहित्यालाही जीएसटीचा झटका

Next

सांगली : सणासुदीचे आणि उपवासाचे दिवस येतील, तशी उपवासाच्या पदार्थांची भाववाढ सुरू झाली आहे. साबुदाणा, शेंगदाणा, वरई यांच्या किमती सरासरी पाच ते दहा रुपयांनी वाढल्या आहेत.

साबुदाणा किलोमागे ५ ते ८ रुपयांनी महागला आहे. किरकोळ विक्रीचे दर प्रतिकिलो ६८ रुपये झाले आहेत. वरई १०० ते ११० रुपये, तर शेंगदाणा १३२ रुपये किलोवर पोहोचला आहे. एक किलो राजगिरा १२० रुपयांना मिळत आहे. तळलेल्या पदार्थांमध्ये शाबू चिवडा २८०, बटाट्याचे वेफर्स ३३०, केळीचे वेफर्स ३२० रुपये किलोवर गेले आहेत.

तुलनेने केळीचे दर स्थिर आहेत. वसईची केळी सरासरी ४० रुपये डझन, तर देशी केळी ८० रुपये डझन या दराने विकली जात आहेत. रताळ्यांचा भाव सरासरी ५० रुपये किलो आहे. एक वाघाटे पाच ते दहा रुपयांना विकले जात आहे.

तेल स्वस्त झाले म्हणून काय झाले?

सुदैवाने खाद्यतेलाचे भाव प्रतिकिलो १५ ते ३० रुपयांनी उतरले आहेत, पण तेल स्वस्त झाले म्हणून उपवासासाठी तळणीच्या पदार्थांवर जोर दिला, तर ऐन श्रावणात आजारपणाचा सामना करावा लागेल याचेही भान ठेवायला हवे.

अशी आहे दरवाढ

पदार्थ -   मे   - जुलै
साबुदाणा - ६० - ६८
शेंगदाणे - ११० - १३२
सफरचंद  - १०० - १५०
मोसंबी  - ६० - ८०
खजूर -  ७०  - ९०

देवपूजादेखील खर्चिक बनली

फक्त उपवासच महागला असे नाही, तर देवपूजादेखील खर्चिक बनली आहे. कापराची एक वडी सरासरी दीड ते दोन रुपयांवर पोहोचली आहे. ७० कापूरवड्यांचे पाकीट १२० रुपयांना खरेदी करावे लागत आहे.


उपवासाच्या पदार्थांच्या भाववाढीला डिझेलची दरवाढ, अतिवृष्टी आणि जीएसटी कारणीभूत ठरले आहेत. जागतिक स्तरावरील अस्थिर वातावरणामुळेही आयातीला फटका बसला आहे. साबुदाण्याचे भाव गतवर्षीच्या तुलनेने फार वाढलेले नाहीत. - अविनाश हळींगळे, किराणा व्यापारी.

Web Title: Fasting of Shravan has become stricter due to inflation, GST has also hit Devpooja materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.