लिंगायत समाजाच्या अल्पसंख्याक दर्जासाठी उद्यापासून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:51 AM2021-02-21T04:51:11+5:302021-02-21T04:51:11+5:30

जत : महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी सांगलीत जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर दि. २२ ...

Fasting from tomorrow for minority status of Lingayat community | लिंगायत समाजाच्या अल्पसंख्याक दर्जासाठी उद्यापासून उपोषण

लिंगायत समाजाच्या अल्पसंख्याक दर्जासाठी उद्यापासून उपोषण

Next

जत : महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी सांगलीत जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर दि. २२ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती लक्ष्मण जखगोंड यांनी दिली.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२१ च्या जनगणनेमध्ये लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून जनगणना व्हावी, लिंगायत समाजास अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, लिंगायत धर्माचा इतर मागास प्रवर्गात ओ.बी.सी. म्हणून समावेश करावा, लिंगायत समाजाला शासनाच्या विविध सवलती मिळाव्यात, जत व मंगळवेढा शहरामध्ये महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभा करावा, राज्यातील प्रत्येक गावात लिंगायत समाजाच्या दफनभूमीस जागा उपलब्ध करून देण्यात यावी. अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी सांगलीत जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर दि. २२ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.

निवेदनावर लक्ष्मण जखगोंड, अनिल पाटील, राजू कमतगी, रावसाहेब पाटील, बसवराज चौगुले, म्हादुराया पाटील, प्रशांत भावीकट्टी, लक्ष्मण बिरादार, पिरगोंडा पटेद, शंकर मदभावी, विकास कल्लोळी, महेश मुंडशी आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Fasting from tomorrow for minority status of Lingayat community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.